AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित

Foreign Freelance Income Tax: भारतात बसून अमेरिकन किंवा इतर परदेशी कंपन्यांसाठी फ्रीलान्सिंग काम करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत आहे. डॉलरमध्ये मिळणारी ही कमाई भारतीय बँकेत रुपयात जमा होते. या परदेशी उत्पन्नावर कर कसा मोजायचा, कोणता ITR फॉर्म भरायचा आणि GST लागू होतो की नाही, याचे संपूर्ण कायदेशीर गणित समजून घेणे प्रत्येक नोकरदारासाठी आवश्यक आहे.

अमेरिकन क्लाइंटकडून डॉलरमध्ये पगार? जाणून घ्या कराचे नियम, ITR आणि GST चे संपूर्ण गणित
ITR RuleImage Credit source: Google
| Edited By: | Updated on: Aug 25, 2026 | 11:47 PM
Share

Foreign Freelance Income Tax: परदेशी क्लाइंट्सकडून मिळणाऱ्या डॉलर पेमेंटवर टॅक्स वाचवण्यासाठी भारत सरकारने फ्रीलान्सर्सना ‘प्रिझम्प्टिव्ह टॅक्सेशन स्कीम’ अंतर्गत मोठा दिलासा दिला आहे. या नियमानुसार, व्यावसायिक खर्च वजा करून थेट 50 टक्के उत्पन्नावर कर सवलत कशी मिळवायची आणि प्राप्तिकर विभागाच्या कडक कारवाईपासून कसे सुरक्षित राहायचे, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

भारतात बसून अमेरिकन कंपन्यांसाठी फ्रीलान्सिंग करणाऱ्या तंत्रज्ञांची संख्या वेगाने वाढत आहे. डॉलरमध्ये मिळणारे हे उत्पन्न भारतीय बँकेत रुपयात रूपांतरित होऊन जमा होते. परदेशी क्लाइंटकडून येणाऱ्या या पैशांवर भारतात कर कसा मोजला जातो, फॉरेन टॅक्स क्रेडिट कसे मिळवायचे, फॉर्म 67 चे महत्त्व आणि ITR चे कायदेशीर नियम काय आहेत.

फ्रीलान्सिंग उत्पन्नावर टॅक्स कसा मोजला जातो?

प्राप्तिकर कायद्यानुसार, फ्रीलान्सिंगमधून होणारी कमाई ‘व्यवसाय किंवा पेशातील नफा’ या अंतर्गत गृहीत धरली जाते. यासाठी फ्रीलान्सर्सना ITR-4 फॉर्म भरावा लागतो. प्रिझम्प्टिव्हे टॅक्सेशन स्कीम (Section 44ADA): जर तुमचे वार्षिक उत्पन्न 75 लाख रुपयांपेक्षा कमी असेल, तर सरकार तुमच्या एकूण कमाईच्या थेट 50 टक्क्यांना व्यावसायिक खर्च मानते. उर्वरित 50 टक्के रकमेवर तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार कर आकारला जातो. यामुळे कोणतीही बिले किंवा हिशोब ठेवण्याची कटकट राहत नाही.

अमेरिकेमध्ये टॅक्स कापल्यास काय करावे?

परदेशी कंपन्या भारतीय फ्रीलान्सर्सकडून Form W-8BEN भरून घेतात, जेणेकरून भारतातच टॅक्स भरता येईल आणि अमेरिकेत TDS कट होणार नाही. मात्र, काही विशेष सेवांमध्ये अमेरिकन कंपन्या तिथल्या नियमांनुसार विथहोल्डिंग टॅक्स कापतात. टॅक्स कपातीचा पुरावा: अमेरिकन कंपन्या परदेशी नागरिकांना केलेल्या पेमेंटची आणि त्यावर कापलेल्या टॅक्सची माहिती देण्यासाठी Form 1042-S जारी करतात. हा फॉर्म तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे, कारण हाच तुमच्या टॅक्स कपातीचा अधिकृत पुरावा असतो.

फॉर्म 67 आणि ITR ची शेवटची तारीख

जर तुमचा टॅक्स अमेरिकेत कापला गेला असेल, तर तोच टॅक्स भारतात पुन्हा भरावा लागू नये भारत सरकारने ‘फॉरेन टॅक्स क्रेडिट’ (FTC) ची सुविधा दिली आहे. अमेरिकेत कापलेला टॅक्स भारतात क्लेम करण्यासाठी तुम्हाला Form 67 ऑनलाईन भरावा लागतो. प्राप्तिकर नियमांनुसार, फॉर्म 67 हा ITR फाईल करण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी किंवा शेवटच्या तारखेपर्यंत सादर करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही हा फॉर्म मुदतीनंतर भरला, तर प्राप्तिकर विभाग तुमचा फॉरेन टॅक्स क्रेडिटचा क्लेम नाकारू शकतो.

GST आणि FIRC चे नियम

तुम्ही परदेशात सेवा देत असाल, तर याला ‘सेवांची निर्यात’ मानले जाते, ज्यावर 0 टक्के GST लागतो. मात्र, तुमचे वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यास GST Registration करणे आणि लेटर ऑफ अंडरटेकिंग (LUT) फाईल करणे बंधनकारक आहे. एक गोष्ट लक्षात असूद्या की, डॉलर खात्यात जमा झाल्यावर बँकेकडून फॉरेन इनवर्ड रेमिटन्स सर्टिफिकेट (FIRC) घेणे आवश्यक आहे, जेणेकरून हे उत्पन्न कायदेशीर परदेशी कमाई असल्याचे सिद्ध होते.

Follow Us