AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपमध्ये या… अमित शाह यांच्याकडून थेट ऑफर; एकनाथ खडसे म्हणाले की..

शरद पवार राष्ट्रवादीचे गटाचे नेते एकनाथ खडसे यांना भाजपात पुन्हा आणण्याची चर्चा सध्या राजकारणात सुरु आहे. मात्र, या प्रकरणावर नेते एकनाथ खडसे यांनी आपली बाजू पहिल्यांदाच मांडली आहे.

भाजपमध्ये या... अमित शाह यांच्याकडून थेट ऑफर; एकनाथ खडसे म्हणाले की..
Amit Shah and Eknath Khadse
| Updated on: Jul 12, 2026 | 11:29 AM
Share

शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते एकनाथ खडसे आणि भाजपातील नाते सध्या तळ्यात मळ्यात सुरु आहे. एकनाथ खडसे यांच्यावर भाजपाचे मंत्री गिरीश महाजन रोज तोंडसुख घेत असतात आणि खडसे देखील त्यांच्यावर प्रचंड टीका करतात. मात्र, गेले काही दिवस भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे म्हटले जात होते. आता तर एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात आपली भूमिका प्रसारमाध्यमात मांडली आहे.

एकनाथ खडसे यांच्यामागे जमीन खरेदी प्रकरणात खटला गुदरल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिट्टी देऊन शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. मात्र, त्यांची सून रक्षा खडसे भाजपात आहे. तर त्याची मुलगी रोहिणी खडसे राष्ट्रवादीत महिला प्रदेशाध्यक्ष आहे. सून रक्षा खडसे यांनी भाजपाने तिकीट दिल्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपावर टीका करणे कमी केले होते. मात्र, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यावरील टीका थांबवली नव्हती. मात्र, आता बदलेल्या राजकीय परीघात एकनाथ खडसे यांनी पुन्हा भाजपात यावे यासाठी पक्षश्रेष्टी स्वत:च पायघड्या घालत आहेत असे चित्र आहे. या संदर्भात एकनाथ खडसे यांनी आपले मन मोकळे केले आहे.

भाजपा प्रवेशाच्या चर्चेवर काय म्हणाले ?

हे मी आधीच स्पष्ट करू इच्छितो की मला भाजपात प्रवेश करण्यामध्ये इंटरेस्ट राहिलेला नाही, मी शरद पवारांसोबत आहे आणि शेवटपर्यंत राहील. माझे कार्यकर्ते हे भाजपमध्ये जातील मी जाणार नाही, माझे कार्यकर्ते इच्छुक आहेत असेही एकनाथ खडसे यांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर आधीच सांगितले आहे.

गिरीश महाजन म्हणाले आहेत की मी फार लहान माणूस आहे, यावर एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले की होय गिरीश महाजन खूप लहान माणूस आहे.  गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतला माणूस आहे. मी एवढ्या लहान माणसासोबत संघर्ष करतोय. गिरीश महाजन मंत्री होईपर्यंत, त्यांना सर्वच परीने मदत केली, गिरीश महाजन यांच्यावर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, तो नसता तर त्यांना कोणी ओळखत नाही अशा शब्दात खडसे यांनी आपला राग व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

अमित शाह यांना तुम्ही भेटला होता काय असे विचारता खडेस म्हणाले की होय मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहा यांनी मला फोन करू बोलावलं होतं. अमित शाहांनी मला सांगितलं या भाजप जॉईन करो असे एकनाथ खडसे यांनी यावेळी गौप्यस्फोट करताना सांगितले.

गिरीश महाजन म्हणतात की माझा विरोध त्यांच्या पक्षप्रवेशाला नाही. मात्र वरच्या लोकांनी मला सांगितलं की, ‘आपको प्रवेश दिया तो, लोकल लोक काम नही करेंगे.. असं मला सांगण्यात आल्याचे एकनाथ खडसे यावेळी म्हणाले.

‘खडसे को लिया तो सीट गिरा देंगे, ऐसा ब्लॅकमेल किया जा रहा है, इस वजह से आप लोकसभा में हमारा काम करो.. आगे देखेंगे’ असा सल्ला आपल्याला दिल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगत, मग माझ्या पक्षप्रवेशाला विरोध करतोय कोण? असा सवाल करीत गिरीश महाजन यांच्यावर नाव न घेता आरोप केला आहे.

एकनाथ खडसे यांचा राजकीय प्रवास

खडसे यांनी २०२० मध्ये भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, गेल्या काही काळात त्यांच्या पुन्हा भाजपा प्रवेशाच्या चर्चा रंगल्या आहेत. साल २०१६ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठी अमित शाह यांच्याकडे आपली बाजू मांडली होती. अखेर, २०२० मध्ये त्यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

येथे व्हिडीओ पाहा –

Follow Us
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...