AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले असते तर…’, फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मिसिंग लिंक प्रकरणात विरोधकांनी महाराष्ट्राचा अपमानच केला असे पुन्हा एकदा सांगितले. या प्रकरणात राज ठाकरे यांचे नाव न घेता त्यांनी बोचरी टीका केली आहे.

'ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले असते तर...', फडणवीस यांची राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका
devendra fadnavis and raj thackeray
| Updated on: Jul 10, 2026 | 5:30 PM
Share

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी मनसेच्या रेल्वे संघटनेच्या वर्धापनदिनाच्या भाषणात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. आता त्यास अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावात देवेंद्र फडणवीस यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हणाले की परवा मी विधान सभेत भाषण केल्यानंतर अनेक लोकांना मिर्ची लागली.पण अतिशय स्पष्टपणे सांगितले की मिसिंग लिंकवर त्या ठिकाणचा पुल, केबल स्टेड ब्रिज आहे, जगातले सगळ्यात मोठे टनेल त्या ठिकाणी आहेत. एकालाही क्रॅक गेला नाही काही जणांनी टीका केली ७ हजार कोटी रुपये पाण्यात गेले. हा माझा अपमान नाही, महाराष्ट्राचाच अपमान आहे असे फडणवीस यावेळी म्हणाले.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की  भाडे की टट्टू म्हटले, तर काही लोक म्हणाले मुख्यमंत्री सुसंस्कृत बोलत नाहीत. भाडे के टट्टू म्हणालो तर काही जण म्हणाले की हिंदीत का बोलले. म्हणून त्यांना मी आता ‘भाटक गदर्भ’ म्हणतो. कोणाला समजले नसले तर सांगतो की याचा अर्थ सुपारीबाज असा आहे. मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो होतो. टोपी फेकली होती. मात्र, अनेकांना टोपी लागली. एक वाक्य हिंदीत बोललो. ते ज्यांना समजायला पाहिजे त्यांच्याऐवजी दुसऱ्यांनाच मिर्ची लागली, असे फडवणीस यांनी यावेळी सुनावले. हिंदीत का बोललो, असे मिमिक्री आर्टिस्ट बोलले. ते आमचे मित्र आहेत.त्यांचा राजकारणात आम्हाला धोका नाही. ‘ते जर स्टँडअप कॉमेडीयन क्षेत्रात गेले तर अनेकांचा कॉमेडिचे दुकान बंद केले असते असा टोलाही फडणवीस यांनी यावेळी लगावला.

मनसेच्या रेल कामगार सेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. मिसिंग पुलाच्या अपघाता संदर्भात प्रश्न विचारले तर महाराष्ट्राचा अपमान कसा असा सवाल राज ठाकरे यांनी केली होती.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे