AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिलिमिटेशन बिल मंजूर झालं तर…सतेज पाटलांनी टेन्शन वाढवलं, सांगितला भविष्यातील धोका!

भाजपाचा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्षाने ठामपणे भूमिका मांडली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडत आहेत, अशी टीका सतेज पाटील यांनी केली.

डिलिमिटेशन बिल मंजूर झालं तर...सतेज पाटलांनी टेन्शन वाढवलं, सांगितला भविष्यातील धोका!
satej patil Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 27, 2026 | 4:18 PM
Share

Delimitation Bill : राजधानी दिल्लीत सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या आधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर केले जाणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आलीय. हे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर व्हावे यासाठी मोदी सरकार विरोधी बाकावरील काही पक्षांना विधेयकाला पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष या विधेयकाला पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. तर काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस, ठाकरे गट तसेच इतर महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवलाय. या सर्व घडामोडी घडत असतानाच हे विधेयक पारित झाल्यास लोकशाहीपुढे मोठं संकट निर्माण होईल, असा दावा काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी व्यक्त केलाय. त्यांनी व्यक्त केलेल्या भीतीमुळे राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालीय.

शरद पवार यांचा पक्ष मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा देऊ शकतो, असा दावा केला जातोय. यावर बोलताना शरद पवार यांच्या पक्षांनी डीलिमिटेशनसाठी काढलाय किंवा नाही, हे मला माहिती नाही. अजून तरी ते इंडिया आघाडी म्हणून आमच्या सोबत आहेत, असं सतेज पाटील म्हणाले. सोबतच डी लिमिटेशन म्हणजे उद्याचे सत्तेचे केंद्र भाजपच्या बाजूने करून घेण्याचा डाव आहे, असा गंभीर आरोपही सतेज पाटील यांनी केला. या विधेयकाला राष्ट्रीय पातळीवर अनेकांनी विरोध केला आहे. आम्हाला अपेक्षा आहे की शरद पवारांची राष्ट्रवादी आमच्या सोबत राहील, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या विधेयकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृतपणे काँग्रेससोबत संवाद झालेला नाही. तीस तारखेपर्यंत वेळ आहे. बऱ्याच घडामोडी घडतील. याचे दुष्परिणाम देशातील राजकारणावर होणार आहेत. दोन दिवसात याबाबत इंडिया आघाडीची बैठक होऊन साधक-बाधक चर्चा होईल आणि भूमिका स्पष्ट होईल, अशी महत्त्वाची माहितीही त्यांनी दिली.

भाजपाचा देशातील लोकशाही संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस पक्षाने ठामपणे भूमिका मांडली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून चुकीच्या गोष्टी घडत आहेत. महिलांना आरक्षण मिळालं पाहिजे, यात दुमत नाही, महिला आरक्षणाबाबत काँग्रेसने स्पष्ट भूमिका मांडली आहे. परंतु विधेयकाच्या मदतीने सत्ता काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आमचा विधेयकाला कायम विरोध असेल, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळे आता अधिवेशन काळात नेमकं काय होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...