तीन महिने छळ, काल नेमकं काय घडलं? पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यचं गूढ वाढलं

Pankaja Munde PA Anant Garje : पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यचं गूढ वाढलं... 9 महिन्यांपूर्वी झालेलं लग्न... 3 महिन्यांपासून सुरु होते छळ... पत्नीने डोळ्यासमोर आत्महत्या केल्यानंतर...., तेव्हा नेमकं काय घडलं? धक्कादायक आहे घटना...

तीन महिने छळ, काल नेमकं काय घडलं? पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीच्या मृत्यचं गूढ वाढलं
Anand Garje
| Updated on: Nov 23, 2025 | 12:30 PM

Pankaja Munde PA Anant Garj : राजकारणात सध्या खळबळ माजली आहे कारण भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी राहत्या घरात स्वतःचं आयुष्य संपवलं आहे. अनंत गर्जे यांच्या पत्नीचं नाव गौरी असं होतं आणि त्या डॉक्टर होत्या. त्यांच्या लग्नात स्वतः पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या. अशात अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची बातमी कळताच पंकजा मुंडे यांनी स्वतःचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार, अनंत गर्जे यांच्याकडून गेल्या तीन महिन्यांपासून पत्नी गौरीचा छळ होत असल्याचं धक्कादायक सत्य समोर येत आहे…

आत्महत्येच्या दिवशी नक्की काय घडलं?

अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी यांनी आत्महत्या केल्यानंतर मामाने हैराण करणारे आरोप केले आहेत… ज्यामुळे मृत्यचं गूढ वाढलं आहे… अनंत गेल्या तीन महिन्यांपासून डॉक्टर पत्नीला त्रास देत असल्याचा दावा गौरी यांच्या मामांनी केली आहे.. ज्या दिवशी गौरी यांनी आत्महत्या केली, त्या दिवशी दुपारी 1 वाजल्यापासून दोघांमध्ये कडाक्याचे भांडण सुरु होते…

सर्वात धक्कादायक आणि मन विचलित करणारं सत्य म्हणजे, जेव्हा गौरी यांनी आत्महत्या केली तेव्हा अनंत गर्जे घरातच बसले होते. अनंत यांच्या डोळ्यांसमोर गौरी यांनी स्वतःला संपवलं… अशी माहिती गौरी यांच्या मामांनी सांगितलं आहे.

दुपारी भांडण टोकाला पोहोचल्यानंतर गौरी यांनी स्वतःला संपवलं. अशात घरातच असलेल्या अनंद गर्जे यांनी पत्नीला रुग्णालयात आणलं… पण तोपर्यंत गौरी याचं निधन झालं होतं…. गौरी यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचं डोंगर कोसळलं आहे.

विवाहबाह्य संबंध आणि व्हॉट्सअॅपवर चॅटींग

8 – 9 महिन्यांपूर्वी गौरी आणि अनंत यांचं लग्न झालं होतं. पण पतीचे दुसऱ्या महिलेसोबत संबंध असल्याचं गौरी यांना कळलं होतं. अनंत यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पुरावे देखील गौरी यांच्या वडिलांकडे असल्याची माहिती मिळत आहे… गेल्या दोन तीन महिन्यांपासून आमच्या मुलीचा छळ सुरु होता. कारण त्याचे काही विवाहबाह्य संबंध मुलीला समजली होती… असं असताना तिने नवऱ्याला माफ केलं… तरी देखील व्हॉट्सअॅपवर चॅटींग सुरू होती…. याचे सगळे पुरावे असल्याचा दावा गौरी यांच्या कुटुंबियांनी केला आहे…

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, गौरी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. आता रिपोर्ट आल्यानंतर पुढील तपास सुरु होईल. कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले आहे. तर मोबाईल रेकॉर्ड देखील तपासले जात आहेत.. वरळी पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरु असल्याची माहिती मिळत आहे.