Pankaja Munde : आपल्याला अशी तरुण पिढी नको जी..पंकजा मुंडे यांचं भगवान गडावरुन मोठं वक्तव्य
Pankaja Munde : "एखाद्या कुत्र्याला दगड मारला तर तो केकाटत जाईल. पण मधाच्या पोळ्याल दगड मारलं तर काय होतं, ते माहित आहे. हे माझं मधाचं पोळ आहे. मधमाशा मध गोळा करण्यासाठी कष्ट करतात तशी माझी लेकरं कष्ट करतात"

“हे सीमोल्लंघनाचं दशक आहे. मुंडे साहेबांचा दसरामेळावा अनेक वर्ष पाहिला. एक अदभूत शक्ती आहे भगवान गडावर. भगवान बाबांचा आशीर्वाद आहे. मुंडे साहेबांनी एवढं प्रेम दिलं तुम्हाला. शिवधनुष्य कोणी पेरलं, कोणी उचललं. प्रभूरामचंद्रांनी शिवधनुष्य उचललं होतं. रावणामध्ये ती ताकद नव्हती. सीतेमध्ये शिवधनुष्य पेलण्याची ताकद होती. ही ताकद पावित्र्यामध्ये आहे. मी भगवान बाबांचे चरणस्पर्श करुन आभार मानते. मी बाबांचे आभार मानते. त्यांच्या पुण्याईमुळे मी इथे आहे” असं मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या भगवान गडावरुन मेळाव्याला संबोधित करत आहेत. “लोक म्हणत होते, दुष्काळ आहे मेळावा कसा होणार. माझे सगळे वाघ उन्हातले, डोंगरातले आहेत. या वाघांना ऊन लागत नाही. तुम्ही शक्ती आहात माझी. गोपनीथ मुंडे परिवार तुमचे उपकार कधी विसरु शकत नाही” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
“दुष्काळात मेळावा कसा होईल विचारत होते, मी त्यांना सांगितलं की, लग चुकी हैं तलब जीत की, अब खुद को आग में झोक देते हैं. केहती है मारा जायेगा, पर हौसले केहते है देख लेगें. कधी कुठला निर्णय घेताना पुढचा विचार केला नाही. एका क्षणात निर्णय घेतला. भगवान भक्तीगड स्थापन केला. ती लेकीची शक्ती आहे. गोपीनाथ मुंडेच्या लेकीची” असं पंकजा मुंडे म्हणाल्या. “एखाद्या कुत्र्याला दगड मारला तर तो केकाटत जाईल. पण मधाच्या पोळ्याल दगड मारलं तर काय होतं, ते माहित आहे. हे माझं मधाचं पोळ आहे. मधमाशा मध गोळा करण्यासाठी कष्ट करतात तशी माझी लेकरं कष्ट करतात. कष्टाचं चीज व्हावं म्हणून स्वाभिमानाने जीवन जगता यावं म्हणून मी माझं जीवन तुम्हाला वाहून टाकलं आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
तरुण पिढीबद्दल काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, “तुम्ही रिल बघता की नाही.पॅरिस, फ्रान्सची न्यूज बघितली असेल, सगळा देश जळतोय. रशियाचं युद्ध, इराणचं युद्ध. आपल्या देशामध्ये आपल्याला अशी तरुण पिढी नको, ज्यांच्यामध्ये देशभक्ती नाही, ज्यांच्या मनात देशाबद्दल आदर नाही” “ज्यांच्या रक्तात देशभक्तीच टॉनिक भिनवण्याची गरज आहे. स्वत:च देश, घर जाळून आंदोलन करणारे नकोत. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून देशभक्ती भिनवलेले गोपीनाथ मुंडे यांच्यासारखे पुढे नेणारे सैनिक हवेत” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
‘मी जालन्यातील अंतरवली दत्तक घेतलं’
“तुम्ही जेन झी आहात. आमचा आर्यमन पण जेन झी आहे. तुम्हाला जेन झी चं नेतृत्व करायचं आहे. जेन झी चं नेतृत्व मुद्याने होऊ शकतं, गुद्याने नाही. दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळाने अनेक भिंती निर्माण केलेल्या आहेत. आपल्याला त्या मोडून टाकायच्या आहेत. आपल्याला माणसा माणसात भिंत उभी करायची नाही. धर्माच्या, जातीच्या भिंती मनगटाने मोडून काढायच्या आहेत. संकट येतं तेव्हा जातीच्या भिंती टिकत नाहीत. दुष्काळ गरीब-श्रीमंतावर येत नाही. तहान गरीब-श्रीमंताला वेगळी लागत नाही. या दुष्काळात जाती-धर्माच्या भिंती आपल्याला मोडून काढायच्या आहेत. मी जालन्यातील अंतरवली दत्तक घेतलं आहे. अंतरवलीचा विकास करणार आहे. माझ्या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गावाइतकं प्रेम तिथे करणार आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.