95 वर्षाच्या आजीचं मतदान, मोफत आरोग्य शिबीर ते पुस्तकं वाटप, बाबासाहेबांना राज्यभरात अनोखी मानवंदना

"महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आम्ही आरोग्य शिबीर आयोजित केले. त्याचा आम्हाला अभिमान आहे. खऱ्या अर्थाने महामानवांचे विचार लोकोपयोगी आहेत, असे समाजाप्रतिमानने हाच आमचा एक हेतू आहे", अशी प्रतिक्रिया चोंभुत गावचे नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष गणेश भालेराव यांनी दिली.

95 वर्षाच्या आजीचं मतदान, मोफत आरोग्य शिबीर ते पुस्तकं वाटप, बाबासाहेबांना राज्यभरात अनोखी मानवंदना
95 वर्षाच्या आजीचं मतदान, मोफत आरोग्य शिबीर ते पुस्तकं वाटप, बाबासाहेबांना राज्यभरात अनोखी मानवंदना
Follow us
| Updated on: Apr 14, 2024 | 7:43 PM

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मिरवणूक काढण्यात आली आहे. काही ठिकाणी बाबासाहेबांच्या अनुयायांनी सामाजिक उपक्रम राबवत बाबासाहेबांना वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील चोंभुत गावात बाबासाहेबांच्या जयंती निमित्त मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून बुद्ध धम्म पद्धतीने पूजा पाठ संपन्न झाला. तसेच प्रमुख पाहुणे, माताभगिनी विद्यार्थीनी ग्रामस्थ यांची अभिवादन पर मनोगते झाली.

यावेळी डॉक्टर गायकवाड मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. यासाठी डॉक्टर प्रियांका गायकवाड आणि डॉक्टर निखिल शिंदे यांनी नागरिकांची आरोग्याची तपासणी करत औषधोपचार केले. या शिबिरमध्ये जवळजवळ 111 ग्रामस्थांनी आणि महिला भगिनींनी सहभाग घेतला. यावेळी विविध कार्यकारी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय कोल्हे,विविध कार्यकारी सोसायटी संचालक जनाजी मस्के,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल पारखे,विविध कार्यकारी सोसायटी संचालक देवराम जमदाडे,किसन गुंजाळ, खंडू शेठ म्हस्के, अशोक मस्के ,तात्याभाऊ माळी,रामदास पारखे, शहाजी जाधव,आळकुटी ग्रामपंचायत सदस्य किरण शिंदे,नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष गणेश रामदास भालेराव खजिनदार संगम भालेराव,सचिव मंगेश भालेराव विजय भालेराव,राजू भालेराव गंगाराम भालेराव,ग्रामपंचायत सदस्य प्रनल पोपट भालेराव,सागर सोनवणे, प्रकाश मस्के, कैलास भालेराव व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

“महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला आम्ही आरोग्य शिबीर आयोजित केले. त्याचा आम्हाला अभिमान आहे. खऱ्या अर्थाने महामानवांचे विचार लोकोपयोगी आहेत असे समाजाप्रतिमानने हाच आमचा एक हेतू आहे”, अशी प्रतिक्रिया चोंभुत गावचे नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष गणेश भालेराव यांनी दिली.

यवतमाळमध्ये 95 वर्षीय आजीने केले लोकशाही बळकट करण्याचे काम

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना लोकशाही बळकट करण्यासाठी मतदानाचा अधिकार दिला आहे. याच अनुषंगाने आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी 95 वर्षीय आजी गंगादेवी शंकरलाल कान्हु यांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे काम केले आहे. निवडणूक आयोगामार्फत 85 वर्षे वरील व्यक्तींना तसेच अपंग व्यक्तींना घरपोच मतदानाचा अधिकार बजावण्याचा हक्क दिलाय. अशातच यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातील पुसद शहरातील गंगादेवी शंकरलाल कान्हु या 95 वर्षीय वयोवृद्ध आजीने मतदान केंद्रावर न जाता घरीच आपला आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गंगादेवी कान्हु यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसून आले.

परभणीत दिव्यांग बांधवांकडून बाबासाहेबांनी अभिवादन

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्यां जयंती निमित्त परभणीत दिव्यांग बांधवांकडून रॅली काढत, ढोल ताशाच्या गजरात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी दिव्यांग बांधवांकडून महामानवाला अभिवादनही करण्यात आले.

18 तास अभ्यास करून बाबासाहेबांना अभिवादन

नांदेड शहरातील नवामोढा भागात विद्यार्थ्यांनी 18 तास अभ्यासक्रमाचा उपक्रम राबवून बाबासाहेबांची जयंती साजरी केली. या उपक्रमाचे कौतुक होत आहे. तसेच नांदेडमध्ये बाबासाहेबांच्या जयंती निमित्त NEET, JEE ची तयारी करणाऱ्या विद्यार्थांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते रवी पोटफोडे यांच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

पुण्यात जेवण आणि पाणी वाटप करुन जयंती साजरी

पुण्यामध्ये आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटाच्या वतीने पुणे शहर शाखेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जेवणाचे आणि पाण्याचे वाटप करण्यात आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह; शिर्डीत विखे पाटलांनी केले अभिवादन

राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता तालुक्यातील लोणी गावात डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं. यावेळी मोठ्या संख्येने अनुयायी उपस्थित होते.

जळगावात मंत्री गिरीश महाजन यांचा मिरवणुकीत ठेका

जळगावच्या जामनेरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीत सहभागी होत मंत्री गिरीश महाजन यांनी हातात लेझीम घेत ठेका धरला. मंत्री गिरीश महाजन लेझीम नृत्य करताना पाहून मिरवणुकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा ठेवण्यात आलेल्या ट्रॅक्टरसुद्धा चालवले. अभिवादन केल्यानंतर मंत्री गिरीश महाजन हे मिरवणूक सहभागी झाले आणि त्यांनी लेझिम नृत्य केलं.

इचलकरंजीत बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

इचलकरंजी शहरामध्ये आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. रात्री बारा वाजल्यापासून शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन शहरातील आजी-माजी आमदार प्रशासकीय अधिकारी यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. यावेळी फटाक्याची आतिषबाजी करून फुलांची उधळण करण्यात आली.

अमरावतीतही जयंतीचा उत्साह

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. या जयंतीच्या निमित्ताने अमरावतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच हजारो अनुयायांनी गर्दी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.