त्या ठेकेदाराला मी विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार.. भाजपाच्या नगरसेविकेच्या विधानाने मोठी खळबळ, थेट सभेतच..

Pimpri Chinchwad Mahangarpalika : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपाच्या ज्येष्ठ महिला नगरसेविकेने एक खळबळ उडवणारे विधान केले. थेट सभेतच जिवंत जाळण्याची भाषा केली. या व्हिडीओनंतर लोकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतोय.

त्या ठेकेदाराला मी विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार.. भाजपाच्या नगरसेविकेच्या विधानाने मोठी खळबळ, थेट सभेतच..
Corporator
| Updated on: Sep 03, 2026 | 9:24 AM

सत्तेची मस्ती कशाला म्हणतात हे भाजपा नगरसेविकेच्या विधानावरून स्पष्ट झाले. भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविकेने थेट  जीबीच्या सभेत केलेल्या विधानाने खळबळ उडाली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या वक्तव्याने सर्वजण थक्क झाले. शहरातील विविध स्मशानभूमीं मधील नादुरुस्त विद्युत दाहिन्यांचा मुद्दा मोरे यांनी सभेत उपस्थित केला. आपण वारंवार तक्रार करूनही दुरूस्ती होत नसल्याचे त्यांनी म्हटले. यासोबतच आपण आयुक्तांनीही पत्र दिल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी म्हटले की, जर हा प्रश्नमार्गी लागला नाही तर पुढच्यावेळी आम्हाला प्रशासनाचा निषेध करावा लागेल. हा विषय जीबीची परवानगी न घेता व्हायला हवा. आपल्या सर्वांनाच तिथे जायचे आहे.

वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नसल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. संबंधित ठेकेदारांची नावे जाहीर करा, सुधारणा झाली नाही तर त्या ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार, असे थेट विधान त्यांनी केले. त्यांच्या या विधानाने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शैलजा मोरे या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत.

यासोबतच त्या माजी उपमहापाैर देखील आहेत. मोरे यांच्या वक्तव्यापूर्वीच विरोधकांनी सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करत सभात्याग केला होता. त्यानंतर मोरे या बोलण्यासाठी उभ्या राहिल्या आणि त्यांनी ठेकेदाराला विद्युत दाहिनीत जिवंत जाळणार असल्याची धमकी दिली. आता मोरे यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय.

शैलजा मोरे यांच्याविरोधात भाजपा काही भूमिका घेणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची सत्ता भाजपाच्या हातात आहे. भाजपा आमदार महेश लांडगे आणि शंकर जगताप यांचे पिंपरी चिंचवडमध्ये वर्चस्व बघायला मिळते. दुसऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवण्यात भाजपाला यश आले. मात्र, थेट सर्वसाधारण सभेत भाजपाच्या नगरसेविकेने केलेल्या या विधानाने मोठी खळबळ उडाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us