वर्ध्यातील शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर अटक

हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या (Attempts to burn teacher in wardha) अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वर्ध्यातील शिक्षिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अखेर अटक
Follow us
| Updated on: Feb 03, 2020 | 6:09 PM

वर्धा : हिंगणघाट शहरात एका शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला बुट्टीबोरी पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या आरोपीचे नाव विक्की नगराळे असून त्याला वर्धा जिल्ह्यातील टाकळघाट परिसरातून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

हिंगणघाट शहरात आज (3 फेब्रुवारी) सकाळी साडे सातच्या सुमारास एका शिक्षिकेच्या (Attempts to burn teacher in wardha) अंगावर पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये शिक्षिका 20 ते 30 टक्के भाजली असून तिला उपचारासाठी नागपुरात हलविण्यात आलं आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (Attempts to burn teacher in wardha) उडाली असून घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.

शिक्षिका (वय 30) दररोज सकाळी आपल्या शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करायचा. आजही शिक्षिका शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत होता. हिंगणघाट शहरातील एका चौकात येताच आरोपीने शिक्षिकेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आरोपी हा शिक्षिकेच्या दारोडा गावातीलच आहे.

शिक्षिका आणि विद्यार्थ्यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

दरम्यान, या घटनेचे वर्ध्यात तीव्र पडसाद उमटतांना दिसले. पीडित शिक्षिकेच्या सहकारी शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन कारवाईची मागणी केली. “पीडित शिक्षिकेला जसा त्रास झाला तसाच त्रास आरोपीलाही झाला पाहिजे. आरोपीला आमच्या ताब्यात द्या”, अशी मागणी त्यांनी केली. “याप्रकरणी 10 दिवसांत चार्जशीट दाखल करुन फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवण्याची मागणी करु, असं आश्वासन पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी दिलं. त्यांच्या या आश्वासनानंतर मोर्चेकरी शांत झाले.

आरोपीवर कारवाई होईल, गृहमंत्र्यांचं आश्वासन

दरम्यान, याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “वर्ध्यातील हिंगणघाट इथे प्राध्यापिकेवरील हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे. आरोपीवर कारवाई करण्यात येईल”, असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.