पूजा चव्हाणचे दशक्रिया विधी गोदावरी पात्रात, तीन मिनिटात पिंडाला कावळा शिवला

| Updated on: Feb 17, 2021 | 12:57 PM

घाटावर पिंड ठेवल्यानंतर तीन मिनिटात कावळा आला आणि पूजाच्या पिंडाला स्पर्श करुन निघून गेला (Pooja Chavan Dashkriya Vidhi)

पूजा चव्हाणचे दशक्रिया विधी गोदावरी पात्रात, तीन मिनिटात पिंडाला कावळा शिवला
गंगाखेडमध्ये पूजा चव्हाणचे दशक्रिया विधी
Follow us on

बीड : परळीतील तरुणी पूजा चव्हाणच्या मृत्यूला (Pooja Chavan Suicide Case) दहा दिवस उलटले आहेत. पूजाचा दशक्रिया विधी गंगाखेडमध्ये गोदावरी नदीकाठी पार पडला. अवघ्या तीन मिनिटात पूजाच्या पिंडाला कावळा शिवला. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांना भावना अनावर झाल्या. (Pooja Chavan Dashkriya Vidhi at Gangakhed Godavari Ghaat)

दशक्रिया विधीमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे पिंडीला कावळा शिवावा लागतो. घाटावर पिंड ठेवल्यानंतर तीन मिनिटात कावळा आला आणि पूजाच्या पिंडाला स्पर्श करुन निघून गेला. यावेळी पूजाच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांची उपस्थिती होती. पूजाच्या आठवणींनी तिचे कुटुंबीय गहिवरले.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी अखेर दोघांना ताब्यात घेतलं आहे. या दोघांची कसून चौकशी करण्यात येणार असून यांची पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात काय भूमिका आहे? याचा तपास पोलीस करणार आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अखेर 11 दिवसानंतर पोलिसांनी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पण हे दोघे कथित व्हायरल क्लिपमधील विलास आणि अरुण राठोड आहेत का? हे सांगण्यास पोलिसांनी नकार दिला.

अरुण राठोड आणि विलास कुठे आहेत?

आम्हाला ज्यांच्या ज्यांच्यावर संशय आहे, अशा लोकांचा आम्ही तपास करू शकतो, असं पोलिसांनी म्हटलं आहे. त्यामुळे पोलिसांनी अटक केलेले नेमके कोण आहेत? याचं कुतुहूल वाढलं आहे. तसेच ऑडिओ क्लिपमधील हे दोघे नसतील तर अरुण राठोड आणि विलास कुठे आहेत? असा सवालही केला जात आहे. (Pooja Chavan Dashkriya Vidhi at Gangakhed Godavari Ghaat)

नेमकं प्रकरण काय आहे?

मूळची परळीची असलेली 22 वर्षाची पूजा चव्हाण पुण्यात शिकण्यासाठी आली होती. तिच्या भावासोबत ती पुण्यातल्या हडपसर भागात रहात होती. रविवारी मध्यरात्री दीड वाजता तिनं सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली. हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिचा जीव गेला. महमंदवाडी परिसरातल्या हेवन पार्कमध्ये ही घटना घडली.

दुसऱ्या दिवशी तिच्या आत्महत्येचा आणि विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. प्रेमसंबंधातूनच पूजानं स्वत:ला संपवल्याचं बोललं जाऊ लागलं. पण पूजाच्या आत्महत्येनंतर कुठलीही चिठ्ठी किंवा इतर मेसेज असलेलं काही सापडलेलं नाही. पोलीसांनीही तशी काही माहिती दिलेली नाही.

संबंधित बातम्या :

संजय राठोडांचा पोहरादेवी दौरा लांबणवीर? प्रसारमाध्यमांशी संवाद साधण्याच्या आशा धुसर

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी दोघे ताब्यात; दोघे कोण? गूढ वाढलं!

(Pooja Chavan Dashkriya Vidhi at Gangakhed Godavari Ghaat)