बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यायचा की नाही? उद्धव ठाकरेंचं ठरलं, ‘मातोश्री’वरून मोठी बातमी

अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. निवडणुकीत पाठिंबा मिळावा यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन देखील केला होता.

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा द्यायचा की नाही? उद्धव ठाकरेंचं ठरलं, मातोश्रीवरून मोठी बातमी
| Updated on: Apr 04, 2026 | 3:41 PM

अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार असल्याचं मातोश्रीवरून शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं, त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. आता विधानसभेचं सदस्यत्व मिळावं यासाठी सुनेत्रा पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून पोट निवडणूक लढवणार आहेत. मात्र दुसरीकडे या मतदारसंघात काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याचं जाहीर केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत पाठिंबा द्यावा, यासाठी सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. परंतु या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Loading...

अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशीच भाजपची इच्छा होती. त्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू होते. मात्र काँग्रेसने या निवडणुकीत उडी घेतल्यामुळे आता ही निवडणूक बिनविरोध होणार नाहीये. सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत? त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अजूनही दोन्ही पक्षांकडून पाठिंब्याबाबत आपली अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाहीये, मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गटाने आता सुनेत्रा पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्षानं पाठिंबा दिला आहे, त्यामुळे या निवडणुकीत मोठी चूरस पहायला मिळू शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us