प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू! पुतणी खुशबूला जीवे मारण्याची धमकी, प्रताप सरनाईक समोर असताना कुटुंबीयांचा दावा

मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांची पुतणी खुशबू पूर्णेकर हिने आपल्याला इन्स्टाग्रामवरून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा केला. ‘प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू,’ अशा आशयाचा संदेश आल्याची माहिती तिने सरनाईक यांना दिली.

प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू! पुतणी खुशबूला जीवे मारण्याची धमकी, प्रताप सरनाईक समोर असताना कुटुंबीयांचा दावा
Pradeep Purnekar case
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 5:35 PM

राज्याचे परिवहन मंत्री आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी आज प्रदीप पूर्णेकरांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यांनी कुटुंबीयांचं सात्वन केलं. यावेळी पूर्णेकरांची पुतणी खुशबू पूर्णेकरला जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती तिने खुद्द प्रताप सरनाईकांना दिली आहे. प्रदीप पूर्णेकरांनंतर पुढचं टार्गेट तू, अशा स्वरुपाची आपल्याला धमकी आल्याची माहिती खुशबू पूर्णेकर हिने सरनाईकांसमोर दिली आहे. मला इन्स्टाग्रामवर मॅसेज आला नेक्स्ट टार्गेट तू, असा धमकी दिल्याचं तिने म्हटलं आहे.

ठाण्यातील शिवसेना उबाठाचे शाखाप्रमुख आणि पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी भेट घेतली. कुटुंबीयांनी आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षेची मागणी केली आहे. त्याशिवाय इतर काही आरोपींच्या अटकेचीही मागणी करण्यात आली आहे. पण यादरम्यानच आता या भेटीमध्ये एक धक्कादायक दावा पूर्णेकरांच्या पुतणीने केला आहे. आपल्याला इन्स्टाग्रामवर आता तुझा नंबर अशी धमकीचा मेसेज मिळाल्याचं तिने म्हटलं आहे. प्रताप सरनाईकांशी बोलताना तिने हा दावा केला आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पण आज खुशबूने धमकी मिळाल्याचा खुलासा केल्यानंतर पूर्णेकर कुटुंबीय हे आता भीतीच्या छायेखाली जगत असल्याचं त्यांनी सांगितलं.

Loading...

दरम्यान, यावेळी प्रताप सरनाईक म्हणाले की, तुमच्यावर अन्याय होणार नाही . जे राजकारण झालं , प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचं प्रत्येकाला दुःख , काही लोकांनी राजकारण केले , पहिल्या दिवसापासून आम्ही संपर्कात आहोत , माहोल असा केले होत की आम्ही या गोष्टी टाळत होतो , रामसोबत परवा बोललो, आज बोललो , आम्ही पूर्णपणे तुमच्या बरोबर आहेत.

यावेळी सरनाईक यांनी स्पष्ट सांगितलं की, आरोपींना भर चौकात फाशी द्या.  वयक्तिकरित्या सगळे वकील उभा करतो, ज्यांनी इथे येऊन राजकीय फायदा घेतला हे तुम्हाला पण माहीत आहे, मी कौटुंबिक भावनेतून बोलत आहेत. एकनाथ शिंदे यांच्याबाबत गैरसमज निर्माण करून घेऊ नका . १०० वेळा आम्ही फोन केल्यावर जे ठाण्यात येत नाहीत. ते राजकारण करायला ठाण्यात आले, असं म्हणत त्यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us