पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी ठाण्यात वातावरण तापलं, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, रस्त्यावर लोकांची प्रचंड गर्दी
Pradeep purnekar death case : ठाण्यातील कार्यालयात घुसून प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर वातावरण तापलं आहे. आता कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून अंत्य संस्काराला नकार दिला आहे.

ठाण्यामध्ये काळ रात्री एक खळबळजनक घटना घडली आहे. एक हत्या करण्यात आली आहे. प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांची त्यांच्या ठाण्यातील कार्यालयामध्ये घुसून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मुळात यामगाे विविध कारणे सांगितले जात आहे. राजकीय वर्चस्व, त्याशिवाय बरेच प्रोजक्ट, त्यातील आर्थिक व्यवहार यातील चढाओढ ही सगळी कारण यामागे असल्याची चर्चा रंगते आहे.
दरम्यान, प्रदीप पुर्णेकर हे ठाणे जिल्हा ठाकरे गटाचे प्रमुख होते. पोलिसांनी एकाला याप्रकरणी अटकही केली आहे. पोलिसांची आणकी एक टीम आरोपींच्या माघावर आहे आणि लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, आता पूर्णेकरांचा मृतदेह पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. पण अंत्यसंस्कार न करण्याची कुटुंबांची भूमिका असल्याने सध्या पूर्णेकरांच्या हत्येप्रकरणी ठाण्यात वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची आणि लोकांची रस्त्यावर प्रचंड गर्दी पाहायला मिळते आहे.
आरोपींना अटक होईपर्यंत पूर्णेकरांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करण्याची कुटुंबाची भूमिका आहे. आरोपींवर कठोर कारवाई व्हावी अशी नातेवाईकांची मागणी आहे. कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. ज्यांनी हा कट रचला आहे. पूर्णेकरांच्या हत्येची सुपारी दिली आहे. त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करत आहेत.