मराठा-कुणबी आरक्षणाबाबत सरकारकडून महत्त्वाची गोष्ट मान्य; मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या घोषणेवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया

मराठा-कुणबी आरक्षणाबाबत सरकारकडून महत्त्वाची गोष्ट मान्य करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचेही प्रसाड लाड यांनी सांगितले.

मराठा-कुणबी आरक्षणाबाबत सरकारकडून महत्त्वाची गोष्ट मान्य; मनोज जरांगे यांच्या उपोषणाच्या घोषणेवर भाजपकडून पहिली प्रतिक्रिया
prasad lad on maratha reservation
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Aug 28, 2026 | 12:27 PM

मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे यांनी यंदा मुंबई वगळून अंतरवाली सराटीतीत उपोषण करण्याची घोषणा केली. परंतु मनोज जरांगे यांनी आमच्या विनंतीनंतर अंतरवाली सराटीत उपोषण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत येणार असल्याचे त्यांनी सांगितले, अशी माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली. सरकारने काढलेले जीआर काही प्रमाणात ग्रामीण भागात पोहोचू शकले नाहीत. चुकीच्या पद्धतीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, असेही प्रसाड लाड यांनी सांगितले.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी मुंबईत आमदार चित्रा वाघ यांच्या हातून राखी बांधली. राखी पौर्णिमा साजरी केल्यानंतर लाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. प्रसाद लाड म्हणाले, ‘आमची मागणी होती की, मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये. मुंबईत सणासुदीचे दिवस आहेत. रक्षाबंधनानंतर गणेशोत्सवाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गणपतीचे मिरवणूक आणि आगमन असेल. दहीहंडी असेल. अशा अनेक गोष्टी असतात. त्यांनी देखील काल जाहीर केले. आमच्या विनंतची मान ठेवला. सरकारने आमच्या मागण्या पूर्ण न केल्या तर आम्ही निश्चित मुंबईत येऊ. आता ते येत नाहीत. त्यामुळे आता सदावर्ते का करतात, हे मला माहीत नाही. माझे ते चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी बोलेल’.

त्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार – प्रसाद लाड

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर नाराजी व्यक्त केली. यावर लाड म्हणाले, मला वाटत नाही, ते असे बोलतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मागील तीन महिन्यात सरकारने जितके जीआर काढायचे, तितके जीआर काढले आहेत. काही ठिकाणी तफावत राहिली आहे. विभागाविभागात जीआर पोहोचू शकले नाहीत. सरकारने काढलेले जीआर ग्रामीण भागात पोहोचू शकले नाहीत. हे निश्चितपणे मान्य करतो. मुख्यमंत्री फडणवीस यांनी विखे पाटलांना निर्देश दिले आहेत की, चुकीच्या पद्धतीने काम करणारे अधिकारी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मुख्यमंत्री फडणवीस पूर्ण करतील. त्यांना माहीत आहे की, मी चर्चा करण्याची भूमिका घेतली, मी जे केलं, ते समाजाने पाहिलं आहे. त्यासाठी त्यांचा माझ्याविषयीचा विचार चांगला असू शकतो. त्यांच्या विचाराचे स्वागत करतो, असे लाड पुढे म्हणाले.

महापौरांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान – लाड

रितू तावडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी जनसंपर्क अधिकारी यांची बदली करण्याची मागणी केली. यावर भाजप नेते लाड म्हणाले, मी स्वत: रितू तावडे यांच्याशी बोललो होतो. त्यांची भूमिका मला सांगितली. तीच भूमिका अमित साटम आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितली. त्यांचं म्हणणं होतं की, जनसंपर्काशी संबंधित पत्र माझ्या कार्यालयातून गेलंच नव्हतं. याबाबतीत त्यांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. जनसंपर्क विभागाच्या माध्यमातून महापौरांची बदनामी थांबली पाहिजे. मुंबईचा महापौर व्यक्ती नसते. तर ती एक संस्था असते. याला 150 वर्षांची परंपरा आहे. महापौरांचा अपमान म्हणजे मुंबईचा अपमान आहे. जो महापौर राहतो, त्याला शेवटपर्यंत महापौर बोललं जातं, असेही तावडे यांनी सांगितले.

Follow Us