प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबांच्या भेटीला, थेट एकनाथ शिंदेंना फोन, नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर त्यांच्याच ऑफिसमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे.

प्रताप सरनाईक पूर्णेकर कुटुंबांच्या भेटीला, थेट एकनाथ शिंदेंना फोन, नेमकं काय घडलं?
प्रताप सरनाईक यांनी घेतली पूर्णेकर कुटुंबाची भेट
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 3:36 PM

काही दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर त्यांच्याच ऑफिसमध्ये गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पूर्णेकर यांच्या कुटुंबाची भेट घेतली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील फोन केला. यावेळी प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई करून त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी यावेळी पूर्णेकर कुटुंबाने केली आहे.

नेमकं काय म्हणाले सरनाईक? 

Loading...

तुमच्यावर अन्याय होणार नाही. या प्रकरणात राजकारण झालं, प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येचं प्रत्येकाला दुःख आहे. काही लोकांनी या प्रकरणात राजकारण केले, पहिल्या दिवसापासून आम्ही संपर्कात आहोत. त्यांनी माहोल असा केला  की आम्ही या गोष्टी टाळत आहोत , राम सोबत परवा बोललो आजही बोललो , आम्ही पूर्णपने तुमच्या बरोबर आहोत. आरोपींना भरचौकात फाशी झाली पाहिजे. मी स्वत: वैयक्तिक सर्व वकील उभे करतो.  काही जणांनी इथे येऊन राजकीय फायदा घेतला, हे तुम्हाला पण माहीत आहे. मी कौटुंबिक भावनेतून बोलत आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाबत गैरसमज निर्माण करून घेऊ नका.  १०० वेळा आम्ही फोन केल्यावर जे ठाण्यात येत नाहीत, ते राजकारण करायला ठाण्यात आले, असं म्हणत यावेळी सरनाईक यांनी उद्धव ठाकरे यांना देखील जोरदार टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरेंची भेट 

दरम्यान या घटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं होतं. स्वत: शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबाची भेट घेतली होती. मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. जोपर्यंत या प्रकरणात तुम्हाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा शब्द उद्धव ठाकरे यांनी पूर्णेकर कुटुंबाला दिला होता. त्यानंतर आता सरनाईक यांनी देखील भेट घेतली आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us