आता छत्र्या, रेनकोटशिवाय घराबाहेर पडूच नका…राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग

मुंबईसह राज्यात मान्सूनपूर्व पावसाने आज हजेरी लावली. राज्यातील अनेक भागात वादळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर अनेक ठिकाणी उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

आता छत्र्या, रेनकोटशिवाय घराबाहेर पडूच नका...राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, विजांच्या कडकडाटासह जोरदार बॅटिंग
Pre-monsoon showers
| Updated on: May 31, 2026 | 8:39 PM

राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी दाखवली आहे. मान्सूनपूर्व पावसाने अनेक ठिकाणी पाणी साचून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याने राज्यात आता असह्य उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्हा, शिरुर येथे पावसाच्या सरींसह गारपीठ देखील झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. नांदेड, मालेगाव, नाशिक आणि धाराशिव येथे पावसाने हजेरी लावल्याचे चित्र आहे. मुंबईतही सकाळी ६ ते ९ च्या सुमारास अनेक भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या आहेत.

शिरूर येथे जोरदार सरी

पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाने आज दमदार हजेरी लावली, त्यामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाला आणि शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.काही ठिकाणी गारपीटही झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.

एकीकडे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा गारवा आणि दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे शेतकऱ्यांसमोर चिंता वाढली आहे. शेतातील उभ्या पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.मान्सूनपूर्व पावसाच्या या दमदार हजेरीमुळे शिरूरकरांना उन्हापासून दिलासा मिळाला असला, तरी या अवकाळी पावसाचा फटका शेती क्षेत्राला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नांदेड येथे वादळी वाऱ्यासह पाऊस

नांदेड जिल्ह्यातील विविध भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे. हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला दिला होता रविवारी पावसाचा येलो अलर्ट दिला होता. नांदेड जिल्हयात आज दुपारी अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मोठा पाऊस झाला. सकाळ पासून जिल्हयात वातावरण सामान्य होते आणि वातावरणात उकाडा होता.मात्र, दुपारी चार नंतर वातावरणात बदल होऊन अचानक वादळी वारे वाहू लागले. नांदेड शहरासह मुदखेड , भोकर , उमरी , धर्माबाद, अर्धापूर तालुक्यात पाऊस झाला. हवामान खात्याने नांदेड जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.

मालेगावात पावसाची हजेरी

मालेगावात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी झाली आहे. शहरात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि जोरदार पाऊस झाला आहे.विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने अचानक वातावरणात बदल झाला.दिवसभराच्या उकाड्यानंतर शहरी भागात कमालीचा गारवा तयार झाला. ग्रामीण भागात मात्र शेतकरी वर्गाचे हाल झाले आहेत.या पावसाने उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले

धाराशिव येथील वाशी तालुक्यात वादळी पावसाचा तडाख्याने झाडे उन्मळून पडली तर जिल्हा परिषद शाळेवरचे पत्र गेले उडून गेल्याची घटना घडली आहे. आज साडेसहाच्या दरम्यान वाशी तालुक्यातील दसमेगाव परिसरामध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाची जोरदार हजेरी झाली आहे. अनेक गावांमध्ये घरांवरील पत्रे उडाले तर शाळांच्या इमारतींचे मोठे नुकसान झाले आहे. दशमेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सर्व खोल्यांवरील पत्रे वादळी वाऱ्याच्या वेगाने दोनशे तीनशे मीटरवर जाऊन पडले. शाळा परिसरातील अनेक वर्षे जुनी मोठी झाडेही उन्मळून पडली. पत्रे उडाल्याने शाळेच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून शाळेच्या मुख्याध्यापक आणि गावच्या सरपंचांनी शाळेची नवीन इमारत बांधून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.

 

Follow Us