अध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंनी करून दाखवलं; पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पवार गटाची मुसंडी; काय मिळालं? पुढे काय होणार?

महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या पाच निकालात तीन जागा महायुतीच्या पारड्यात पडल्या तर दोन जागा राष्ट्रवादी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्या आहेत.

अध्यक्ष होताच शशिकांत शिंदेंनी करून दाखवलं; पहिल्याच मोठ्या निवडणुकीत पवार गटाची मुसंडी; काय मिळालं? पुढे काय होणार?
sharad pawar and shashikant shinde
| Updated on: Oct 28, 2026 | 10:09 PM

 

महाराष्ट्र विधान परिषदेच्या २०२६ च्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची मतमोजणी अत्यंत चुरशीची होत आहे. मंगळवारी दुपारी चार वाजल्यानंतर मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर अनेक जागांवरील कोण बाजी मारणार कोणाची आघाडी हे चित्र अस्पष्ट होते. त्यात बुधवारी दुपारी तीन वाजल्यानंतर हळूहळू या लढतीचे चित्र हळूहळू स्पष्ट होत गेले. महायुतीने पुणे शिक्षक, नागपूर पदवीधर तसेच अमरावती शिक्षक मतदार संगात विजयी आघाडी घेतले. तसेच महाविकास आघाडीने छत्रपती संभाजीनगर आणि पुणे पदवीधर मतदार संघात विजयी आघाडी घेतली आहे. महाविकास आघाडीच्या दोन्ही जागांवर आश्चर्यकारकपणे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद मिळाल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

Loading...

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची दोन शकले झाली. एक गट दिवंगत अजितदादाच्या यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाला. त्यानंतर शरद पवार यांचे शिवसेनेप्रमाणे पक्षाचे नाव आणि चिन्हही गेले. त्यानंतर अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक गटाची आगेकूच सुरु होणार इतक्यात अजितदादा पवार यांचे बारामती विमान अपघातात आकस्मिक निधन झाले. त्याआधी दोन्ही राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत एकत्र येणार असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, अजितदादा यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण लांबले गेले.

आता महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या निवडणूका या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेल्या.या निवडणूकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने आश्चर्यकारकपणे पाच पैकी दोन जागा आपल्या खात्यात घेतल्या. त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाचा हा विजय मानला जात आहे.

राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

पुणे पदवीधर मतदार संघात हर्षदा देशमुख जाधव यांनी 1,11,349 मते मिळवत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या स्मिता जाधव यांचा पराभव केला आहे.स्मिता जाधव यांना 1,02,479 मते मिळाली आहेत. तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार सुनील मोदी यांना केवळ ३,०६६ मते पडल्याने त्यांचा दारुण पराभव झाला आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे उमेदवार प्रतापसिंह पाटील यांना विजय झाला आहे. प्रतापसिंह पाटील यांना ७३,९७३ मते मिळाली आहे. तर अजितदादा यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण ६०,८१८ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर गेले. तर ठाकरे यांच्या शिवसेनेच्या दिलीप घुगे यांनी ८,३६६ मते मिळाली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us