Vidyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्… विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, ताबडतोब गुन्हा दाखल करा; थेट होतेय मागणी

Vidyanand Bapat Viral: पुण्यातील विद्यानंद बापट हे सर्वत्र आता चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी पुण्यातील गणेशोत्सवातील डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणाचा विरोध केला आहे. आता या दरम्यान विद्यानंद बापट यांच्यावर पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ यांनी गंभीर आरोप केले आहेत.

Vidyanand Bapat: घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्... विद्यानंद बापट नक्षली मानसिकतेचा, ताबडतोब गुन्हा दाखल करा; थेट होतेय मागणी
| Updated on: Sep 03, 2026 | 9:33 AM

Vidyanand Bapat Video Viral: गणेशोत्सव काळात पुण्यात डीजे बंदी आणि ध्वनीप्रदुषणावरुन सध्या जोरदार वाद सुरु आहे. या सगळ्या दरम्यान एका व्यक्तीची जोरदार चर्चा होत आहे त्या म्हणजे विद्यानंद बापट. मुलाखतीत त्यांनी आपण नास्तिक असल्याचं सांगितलं, तर प्रत्येकाला धर्मस्वातंत्र्य आहे, डीजेचा सर्वसामान्य लोकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी देखील घेणे आवश्यक आहे.” सध्या सर्वत्र विद्यानंद बापट यांची चर्चा सुरु आहे, ही चर्चा फक्त त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावरुन नाही तर त्यांच्या शुद्ध मराठी भाषेमुळे होत आहे. विद्यानंद बापट यांच्या संस्कृत श्लोकाची सर्वत्र चर्चा रंगली. आता मात्र याच विद्यानंद बापट यांच्यावर एक मोठा आरोप केला जात आहे.

विद्यानंद बापट यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. काहीनी त्यांच्या या मताचा आदर करत त्यांना समर्थन दर्शविले आहे, एक तापट बापट म्हणत काहींनी आपला पाठिंबा दर्शवला आहे, डीजे आणि ध्वनीप्रदुषणमुक्त गणेशोत्सवाची मागणी करत अनेक पुणेकर एकत्र आले आहेत, तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पुणेकरांनी सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा कारवा असे म्हटले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी तर थेट इशारा दिला आहे. पुण्यात गणेशोत्सव काळात डीजे वाजवू नये, ध्वनीप्रदुषण करू नये, लेझरचा वापर टाळावा. जर असं केलं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करु असा इशारा स्पष्ट शब्दात दिला आहे.

विद्यानंद बापट हा एक अराजकवादी नक्षली मानसिकतेचा आहे, असा गंभीर आरोप पुण्यातील शिक्षणतज्ज्ञ धनंजय कुलकर्णी यांनी त्याच्यावर केला आहे. समाजात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात केली आहे. डी.जे.बाबत बोलत होते तिथपर्यंत ठीक आहे पण त्यांनी पुण्याच्या गणेशोत्सवाबद्दल काहीही बोलू नये, आम्ही सुद्धा सदाशिव पेठेत राहतो, आम्हालाही आवाजाचा त्रास होतो पण तर त्यांनी हा मुद्दा सोडून इतर काही मुद्दे असतील तर त्यावर बोलावे, असे मत शशांक महाजन यांनी आपले मत व्यक्त केले. धनंजय कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, ते विद्यानंद बापट यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार देणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us