पुण्यात दिसलं माणसातलं देवपण! PMP कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, कौतुकास्पद कामगिरीचं होतंय सर्वत्र कौतुक

पुण्यातील पीएमपी कर्मचाऱ्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. या कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला मौल्यवान वस्तू परत दिली आहेत. जाणून घ्या नेमकं काय घडलं

पुण्यात दिसलं माणसातलं देवपण! PMP कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा, कौतुकास्पद कामगिरीचं होतंय सर्वत्र कौतुक
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 22, 2026 | 7:52 AM

पुणे : भारत, महाराष्ट्र झपाट्याने बदलत आहे. या धावपळीच्या जगात प्रवासादरम्यान एखादी मौल्यवान वस्तू चुकून सार्वजनिक वाहनात राहिल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे सार्वजनिक वाहनात विसरलेली वस्तू पुन्हा मिळण्याची शक्यता धूसर मानली जाते. अनेक जण सार्वजनिक वाहनात राहिलेल्या वस्तूची अनेक जण शोधाशोध देखील करत नाहीत. काही प्रवासी बस, रिक्षामध्ये पुन्हा मिळवण्याच्या फंडातही पडत नाही. आता कुठे लोकांमध्ये प्रामाणिकपणा राहिला आहे, असे म्हणत प्रवासी विसरलेली महागडी वस्तू शोधण्याचेही कष्ट घेत नाहीत. परंतु लाखांतून एक जणच असा प्रामाणिकपणा दाखवतात. पुण्यात याच प्रामाणिकपणाचं कौतुक होत आहे.

पुण्यातही झपाट्याने शहरीकरण वाढलं आहे. पुण्यातील हजारो प्रवासी सार्वजनिक वाहनावर अवलंबून असतात. पुण्यातील शहरी भागात राहणारा नागरिक हे पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसने प्रवास करतात. याच महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. पुण्यातील स्वारगेट आगारातील पीएमपी कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्यात येत आहे.
पीएमपी बसमध्ये हरवलेली बॅग कर्मचाऱ्याने प्रवाशाला परत केली आहे. या बॅगेत दीड लाख रुपये किमतीचा लॅपटॉप होता. प्रवाशी शोधत स्वारगेट आगारात आल्यावर बॅग परत केली. संदीप लहान व चालक चव्हाण यांच्या प्रामाणिक कृतीचं कौतुक केलं जात आहे.

काही महिन्यांआधीही दिसला कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा

स्वारगेट आगरातील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा याआधी देखील समोर आला आहे. या आगारातील कर्मचाऱ्यांनी अनेकदा मौल्यवान वस्तू परत केल्या आहेत. सोशल मीडियावरही स्वारगेट आगारातील कर्मचाऱ्यांचं कौतुक होत आहे. काही महिन्यांपूर्वी पीएमपी कर्मचाऱ्यांनीच एका वृद्ध महिला प्रवाशाला तिचे हरवलेले दागिने सुखरूप परत केले होते. स्वारगेट ते औराद बसमध्ये प्रवास करणाऱ्या 76 वर्षीय वृद्ध महिला प्रवासी लोचना नागनाथ गायकवाड यांची 1.5 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने परत केले होते. लोचना या पिशवी बसमध्येच विसरल्या होत्या. त्यानंतर कर्तव्यावर असलेले वाहक रामा गायकवाड आणि चालक विकी तपास यांनी ही पिशवी ताब्यात घेतली. त्यानंतर त्यात दागिने असल्याचे आढळले.पुढे त्यांनी वेळ न दडवता तातडीने माहिती काढून महिला प्रवाशांसी संपर्क साधला. भेट झाल्यानंतर त्यांनी सर्व दागिने सुखरूप त्यांच्या स्वाधीन केले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us