Pune : थरकाप उडवणारी घटना! पिंपरीनंतर पुण्यात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू… काय घडलं?

पुण्यात विषारी दारूच्या सेवनाने हडपसरभागात पाच जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने याप्रकरणी एकाल अटक केली आहे.

Pune : थरकाप उडवणारी घटना! पिंपरीनंतर पुण्यात एकाच दिवशी 5 जणांचा मृत्यू… काय घडलं?
पुण्यातील मृत्यूप्रकरणी एकाला अटक
| Edited By: | Updated on: May 29, 2026 | 9:51 AM

पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर भागात 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने विषारी दारू मृत्यू प्रकरणी योगेश वानखेडे याला अटक केली आहे. पुण्यात काळेपडळ पोलिस स्थानकाच्या हद्दीत 5 जणांचा मृत्यू झाला, पिंपरी चिंचवड मध्ये झालेल्या मृत्यूप्रमाणेच ही घटना घडली आहे. वानखेडे यानेच पिंपरी चिंचवड आणि पुण्यात स्पिरिट पोहचवल्याची माहिती आहे. मृत्यूच्या घटनेनंतर वानखेडे स्वतः हजर झाला. अखेर त्याला अटक करण्यात आली असून चौकशी सुरू आहे. मात्र पिंपरी-चिंचवड पाठोपाठ पुण्यातही आता 5 लोकांचा मृत्यू झाल्याने प्रचंड खळबळ माजली असून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पोटामध्ये दुखत असल्याने आणि चक्कर आल्याने मृत्यू झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.

गावठी दारूने घेतला जीव ?

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या फुगेवाडी येथे केमिकलयुक्त स्पिरिटचा वापर करून अत्यंत घातक अशी गावठी दारू तयार करण्यात आली होती. हीच जीवघेणी दारू फुगेवाडीसह पुण्याच्या हडपसर भागातही विक्रीकरता पाठवण्यात आली. ती विकत घेऊन त्याचेचे सेवन केल्यामुळे अनेकांना प्राणास मुकावं लागलं आणि हा अनर्थ घडला असावा, असा दाट संशय व्यक्त होत आहे.

मृत पावलेल्या नागरिकांबदल काही माहिती हाती आली असून ते हडपसर परिसरातीलच रहिवासी होते, असे समजते. मृतांपैकी एकाचा मृत्यू हा काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाला. तर उर्वरित चौघांचे मृत्यू हे हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांपैकी सर्वांनाच पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास झाला होता, सर्वांना सारखीच लक्षण जाणवली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाथी आल्यावरच पुढील तपास होऊ शकतो.

पुण्यात हडपसर येथे मृत्यू झालेल्यांची नावं –

1.राहुल शरद क्षीरसागर (वय 45 वर्षे) रा. हडपसर पुणे

2 विजय भू कुरलाल शर्मा (वय 45 वर्षे) रा. हडपसर पुणे

3. अरुण डाडर – हडपसर

4. अशोक रमेश चव्हाण , रा. काळेपडळ

Follow Us