चंद्रकांत पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना हात जोडले, म्हणाले, आता हा विषय…

| Updated on: Dec 02, 2022 | 6:34 PM

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे आहेत.त्यामुळे माझी राजांना हात जोडून विनंती आहे.

चंद्रकांत पाटील यांनी भर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना हात जोडले, म्हणाले, आता हा विषय...
Follow us on

पुणेः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांबरोबरच राज्यपालांवरही त्यांनी निशाणा साधला होता. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपचे खासदार उदयनराजे यांनी आक्रमक होत. त्यांनी आता रायगडावर आक्रोश करण्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत उदयनराजे यांना उत्तर देताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट हात जोडून विनंती करत त्यांनी हा विषय इथेच संपवण्याची मागणी केली आहे.

त्याआधी त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांची मुंडकी छाटावी वाटतात असं वादग्रस्त वक्तव्य केले. तर आता रायगडावर जाऊन आक्रोश करणार असल्याचा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.

त्यामुळे याविषयावर मंत्री चंद्रकांत पाटील यानी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या सगळ्यांसाठी आदरणीय आहेत.

त्यामुळे राज्यपालांकडून चुकून काही चूक झाली असेल तर त्यांनी हा विषय आता इथे संपवावा अशी विनंती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उदयनराजे यांना केली आहे.

खासदार उदयनराजे यांनी रायगडावर जाऊन आपण आक्रोश करणार असल्याचा इशारा दिल्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आहेत. त्याबरोबरच ते आमचे आदरणीय आहेत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्याशिवाय त्यांचा उल्लेख करणेही योग्य नाही अशा शब्दात त्यांनी त्यांचा गौरव केला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, ते श्रीमंत छत्रपती उदयनराजे आहेत.त्यामुळे माझी राजांना हात जोडून विनंती आहे की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवनेरीवर जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेतले आहे.

त्यांच्या बोलण्यातून एखादी गोष्ट चुकीची घडली असेल तर हा विषय त्यांनी इथेच संपवावा अशी विनंतीही त्यांनी येथे केली आहे.

त्याच बरोबर भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या आणि आमच्या कोणाच्याही डोक्यात छत्रपतींचा अनादर करणे हा विषय असूच शकत नाही असा त्यांनी शब्दही त्यांनी दिला आहे.