Solapur Gram Panchayat Election Results 2021: ‘या’ गावात आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड; महाविकास आघाडी, भाजपही पराभूत

| Updated on: Jan 18, 2021 | 2:41 PM

ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. (ramdas athawale's panel win in gram panchayat election)

Solapur Gram Panchayat Election Results 2021: या गावात आठवलेंचा सर्वांनाच धोबीपछाड; महाविकास आघाडी, भाजपही पराभूत
Follow us on

सोलापूर: ग्रामपंचायत निवडणुकीत संपूर्ण राज्यात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र, एका ग्रामपंचायत निवडणुकीत या चारही पक्षाला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या गटाने धूळ चारली आहे. आठवले गटाच्या या विजयामुळे एकच जल्लोष केला जात आहे. (ramdas athawale’s panel win in gram panchayat election)

रिपाइं नेते रामदास आठवले यांनी अक्कलकोट तालुक्यातील बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीत त्यांचं पॅनल उतरवलं होतं. आरपीआयचे विजयकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली गेली. गायकवाड यांनी या निवडणुकीचं अचूक नियोजन केलं होतं. घरोघरी जाऊन प्रचार करतानाच येथील मतदारांच्या समस्याही जाणून घेण्याचं काम गायकवाड यांनी केलं होतं. त्यामुळे रिपाइंच्या पूर्ण पॅनलला मोठा विजय मिळाला आहे. बॅगेहळ्ळी ग्रामपंचायतीतील 7 पैकी 7 जागांवर गायकवाड यांच्या पॅनलची सत्ता आली आहे. यावेळी आरपीआयने स्थानिक आघाडीतील काँग्रेस, भाजप सर्वपक्षीय गटांना धक्का दिला.

सोलापूर जिल्ह्यात एकूण 657 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. त्यापैकी 67 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर 4 ग्रामपंचायतीच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती मिळाली होती. त्यामुळे उर्वरीत 587 ग्रामपंचायतीसाठी मतदान पार पडले होते. सोलापुरातील उरलेल्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. विशेष म्हणजे आठवले गट बॅगेहळ्ळीत निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.

ग्रामपंचायत निवडणुकीचा लेखाजोखा

निवडणूक जाहीर ग्रामपंचायती- 14,234
आज प्रत्यक्ष मतदान झालेल्या ग्रामपंचायती- 12,711
एकूण प्रभाग- 46,921
एकूण जागा- 1,25,709
प्राप्त उमेदवारी अर्ज- 3,56,221
अवैध नामनिर्देशनपत्र- 6,024
वैध नामनिर्देशनपत्र- 3,50,197
मागे घेतलेली नामनिर्देशनपत्र- 97,719
बिनविरोध विजयी होणारे उमेदवार- 26,718
अंतिम निवडणूक रिंगणातील उमेदवार- 2,14,880 (ramdas athawale’s panel win in gram panchayat election)

 

संबंधित बातम्या:

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021 LIVE | संदीप क्षीरसागर यांना काका जयदत्त क्षीरसागर यांचा धक्का

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: चंद्रकांतदादा, विखे-पाटील, राणेंना धक्का; भाजपच्या दिग्गजांनी गावातल्या ग्रामपंचायती गमावल्या

Satara Gram Panchayat Election Results 2021: मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब; शंभूराज देसाई यांची पहिली प्रतिक्रिया

(ramdas athawale’s panel win in gram panchayat election)