Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्ष इफेक्ट, पुणे पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द, वाचा पत्रात नेमके काय म्हटलंय…

| Updated on: Jun 28, 2022 | 12:34 PM

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदार आणि खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयांची तोडफोड केली जातयं. तसेच बंडखोर आमदारांविरोधात रॅली आणि सभांचे देखील आयोजन केले जातयं. इतकेच नाही तर काही ठिकाणी बंडखोर आमदांराच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत.

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्ष इफेक्ट, पुणे पोलिसांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द, वाचा पत्रात नेमके काय म्हटलंय...
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात (State) सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या 28 जून ते 12 जूलैपर्यंत सुट्ट्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलायं. यादरम्यान फक्त वैद्यकीय रजा वगळून साप्ताहिक सुट्ट्या देखील रद्द करण्यात आला आहेत. पोलीस महासंचालकांनी हे आदेश काढल्याचे कळते आहे. पुण्यात (Pune) कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे समजते आहे. मुंबईमध्ये देखील जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक राजकिय घडामोडी घडतायंत.

इथे वाचा पुणे पोलिसांसाठी काढण्यात आलेले पत्र

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता

या आदेशामध्ये म्हटंले आहे की, सर्व परिमंडळीय पोलीस उपआयुक्त, विभागीय सहा. पोलीस आयुक्त व सर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कळविण्यात येते की, सध्या महाराष्ट्र राज्यात तयार झालेल्या राजकीय परिस्थितीच्या अनुषंगाने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याकरिता बंदोबस्ताकरीता जास्तीत-जास्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरीता दि.28/06/2022 ते दि.12/07/2022 या कालावधीत सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या सर्व प्रकारच्या रजा (वैदयकिय रजा वगळुन) व साप्ताहिक सुट्टी रद्द केला जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदार आणि खासदार यांच्या जनसंपर्क कार्यालयांची तोडफोड केली जातयं. तसेच बंडखोर आमदारांविरोधात रॅली आणि सभांचे देखील आयोजन केले जातयं. इतकेच नाही तर काही ठिकाणी बंडखोर आमदांराच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्हातील पोलिसांच्या सर्व सुट्ट्या या रद्द करण्यात आल्या आहेत. चार-पाच दिवसांपूर्वी तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.