AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, आज राज्यपालांना पत्र देणार? 9 मोठ्या घडामोडी एका वाक्यात!

Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्ताबदलाच्या घडामोडींना वेग आला आहे.

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता, आज राज्यपालांना पत्र देणार? 9 मोठ्या घडामोडी एका वाक्यात!
महत्त्वपूर्ण राजकीय घडामोडीImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 28, 2022 | 7:45 AM
Share

मुंबई : बंडखोर शिंदे (Ekanth Shinde News) गटाबाबत आता पुढे नेमकं काय घडतं, याकडे महाराष्ट्राच्या राजकीय (Maharashtra Political Crisis) वर्तुळाचं लक्ष लागलंय. त्याच पार्श्वभूमीवर आता चर्चांना उधाण आलेलं असतानाच एकनाथ शिंदे आता महाराष्ट्रात येणार असल्याचं सांगितलं जातंय. तर दुसरीकडे आता सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पुढील सुनावणी ही 11 जुलैला पार पडणार आहे. या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाच्या 8 घडामोडी थोडक्यात आणि फटापट जाणून घेणार आहोत. नेमक्या त्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात…

9 घडामोडी एका वाक्यात :

  1. राज्यातील सत्ताबदलाच्या घडामोडींना वेग, येत्या 48 तासांत एकनाथ शिंदे महाराष्ट्रात येण्याची शक्यता
  2. शिंदे गट आज राज्यपालांना पत्र पाठवण्याची शक्यता, मविआचा पाठिंबा काढल्याच्या पत्राबरोबर शिंदे गटच शिवसेना असल्याचा करणार दावा
  3. महाराष्ट्रातल्या सत्ताकाऱणात लवकरच राज्यपालांची एंट्री, विश्वास दर्शक ठरावासंदर्भात कोश्यारी सरकारला विचारणा करु शकतात, सूत्रांची माहिती
  4. बंडखोर महाराष्ट्रात परतण्यापूर्वी महाराष्ट्रात निमलष्करी दल, राज्यपालांची विनंती केंद्र मान्य करण्याची शक्यता
  5. भाजप थेट राज्यपालांकडे अविश्वास प्रस्तावाची मागणी करणार नाही, मित्रपक्षातील नेता अविश्वास प्रस्तावाची मागणी करण्याची शक्यता, सूत्रांची माहिती
  6. भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत, शिंदेंचा प्रस्ताव आल्यास विचार करु, भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
  7. महाराष्ट्रावर फुटी-तुटीचे संकट भाजपमुळे, महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, सामनातून शिंदे गटासह भाजपवर निशाणा
  8. भाजपवाले सर्व घोडे घेऊन गेले, तुम्हाला पाडलं नाही तर माझं नाव आदित्य सांगणार नाही, आदित्य ठाकरेंचं बंडखोरांना आव्हान
  9. संजय राऊत आज ईडीच्या चौकशीला गैरहजर राहण्याची शक्यता, जमीन घोटाळा प्रकरणी ईडीचं राऊतांना समन्स

सोमवारी सुप्रीम कोर्टात काय घडलं?

बंडखोर शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात निलंबनाच्या नोटिसीसह विधानसभा उपाध्यक्षांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावाच्या मुद्द्यावर याचिका दाखल केली होती. त्यावर सोमवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीच्या शेवटी सर्व पक्षकारांना सुप्रीम कोर्टानं नोटीस जारी केली. त्यानंतर या संबंधातली सर्व कागदपत्र आता सर्व पक्षकारांना कोर्टात सादर करावी लागणार आहेत. तर पुढील सुनावणी 11 जुलै रोजी करण्यात येईल, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे बंडखोर 16 आमदारांच्या निलंबनाची कारवाईही तूर्तास टळलीय. 11 जुलैपर्यंत आता महाराष्ट्रात पुन्हा रंगतदार राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार