AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्जमाफीची आनंदवार्ता, दुसर्‍या यादीत इतक्या शेतकर्‍यांना लाभ, आकडाच समोर आला, पण ही अट पूर्ण करणार्‍यांनाच फायदा मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी आनंदवार्ता समोर आली आहे. राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. आता दुसऱ्या यादीत इतक्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याविषयीची घोषणा केली आहे. त्यांनी कर्जमाफीसाठीची अट काय असेल हे पण स्पष्ट केले आहे.

कर्जमाफीची आनंदवार्ता, दुसर्‍या यादीत इतक्या शेतकर्‍यांना लाभ, आकडाच समोर आला, पण ही अट पूर्ण करणार्‍यांनाच फायदा मिळणार, कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा
कर्जमाफीची आनंदवार्ता, दुसर्‍या यादीत इतक्या शेतकर्‍यांना लाभ
| Updated on: Jul 28, 2026 | 12:28 PM
Share

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी विषयी मोठी आनंदवार्ता दिली आहे. अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवशी 22 जुलै रोजी राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली होती. त्यानंतर दुसर्‍या यादीत किती शेतकऱ्यांचा समावेश असेल याचा आकडा समोर आला आहे. तर कर्जमाफी योजना ही तीन टप्प्यात राबवण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. कर्जमाफीसाठी काही अटींसह कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.

16 लाख 95 हजार शेतकर्‍यांना फायदा

शेतकर्‍यांना आश्वासित करतो, शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे, त्यात एकावर पीक कर्ज होतं आणि यादीत नाव आलं नाही असं त्यांना वाटलं. कर्जमाफीच्या अटीत बसतील, अजून ५६ लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे, असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लाभ लगेच शेतकर्‍यांना मिळेल असेही त्यांनी जाहीर केले. कर्जमाफी ही तीन टप्प्यात राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

कर्जमाफीच्या याद्या प्रसिद्ध होत आहे, दुसर्‍या यादीत 16 लाख 95 हजार शेतकरी असल्याचे भरणे यांनी स्पष्ट केले. जशा याद्या कागदपत्र पूर्ण होतील तशा याद्या लागतील. कर्जमाफीच्या अटीत बसतील, अजून 56 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर लाभ लगेच शेतकर्‍यांना मिळेल.यादीत नाव असेल किंवा नसेल पूर्तता झाली की नाव येईल. याद्या प्रसिद्ध होतील, काळजी करु नका, असे आश्वासनही भरणे यांनी दिले.

40 हजार कोटींची मदत

शेतकऱ्यांना 40 हजार कोटी रूपयांची रक्कम दिली जाणार आहे. थकबाकीची दोन लाखांची रक्कम माफ केली जाणार आहे. तक्रारी असतील तर दुरूस्त केली जाणार आहे. कर्जमाफीची योजना सुटसुटीत आहे. यादीत योग्य कागदपत्र दिली तर लाभ नक्कीच मिळणार आहे. अमरावतीत सर्वाधिक जास्त पेरणी झाली आहे. सर्वात कमी पेरणी ठाण्यात झाली आहे. पावसाचा अंदाज घेत पेरणी होते आहे असे कृषिमंत्री म्हणाले.

त्यात मला काही चुकीचं वाटत नाही

प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांनी शरद पवार भेट घेतली यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे देशाचे नेते आहेत. पवार यांची भेट घेणे, आशीर्वाद घेणं मला कुठेही चुकीचं वाटत नाही असे दत्तात्रय भरणे म्हणाले. पालघर येथे मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठे नुकसान झाले. त्यांना यासंदर्भात निश्चित मदत केली जाईल. आमचं सरकार शेतकर्‍यांच्या बरोबर आहे, असे भरणे म्हणाले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार