AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा, दत्तात्रय भरणे यांचा नवीन फॉर्म्युला, पैसे खटाखट खात्यात कधी जमा होणार?

Punyashlok Ahilyadevi Holkar Farmer Loan Waiver Scheme 2026: शेतकरी कर्जमाफीविषयी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. कर्जमाफीतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाल्यानंतर त्यांनी पुढील टप्पा सांगितला.

Farmer Loan Waiver : शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा, दत्तात्रय भरणे यांचा नवीन फॉर्म्युला, पैसे खटाखट खात्यात कधी जमा होणार?
शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी घोषणा
| Updated on: Jul 26, 2026 | 2:52 PM
Share

Farmer Loan Waiver Scheme 2026: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली आहे. त्यांच्या खात्यात या महिन्याच्या अखेरपर्यंत पैसा जमा होईल. त्यांचे कर्जखाते निरंक होईल. त्यांना नव्याने पीककर्ज घेता येईल. तर कर्जमाफी किती टप्प्यात राबवण्यात येणार? ती कधीपर्यंत पूर्ण होणार याविषयीची माहिती थोड्यावेळापूर्वी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. इंदापूरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी कर्जमाफीतील पुढील टप्पेही सांगितले. येत्या काही दिवसात उर्वरीत पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धडाधड पैसे जमा होतील.

कर्जमाफी तीन टप्प्यात

कर्जमाफी संदर्भात पहिली स्टेप झाली आहे. तीन ते चार स्टेप होतील. पहिल्या स्टेपला पुणे जिल्ह्याला साधारण साडेपाचशे कोटी रुपये रक्कम मिळाले आहेत. तीन स्टेपमध्ये ही कर्जमाफी होणार आहे. साधारण तीन स्टेप मध्ये 40 हजार कोटी रुपये राज्यातील शेतकर्‍यांना मिळतील, अशी महत्त्वाची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. यामुळे एका फटक्यात कर्जमाफी होणार नाही हे स्पष्ट आहे.

कृषिमंत्र्यांची नवी डेडलाईन

आज पहिली स्टेप झाली आहे. साधारण पुढच्या महिन्यापर्यंत, महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, अशी नवीन डेडलाईन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरमध्ये माध्यमांशी बोलताना दिली. यापूर्वी 30 जून हा मुहूर्त होता. त्यानंतर 5 जुलै ही डेडलाईनही हुकली होती. त्यानंतर अजितदादांची जयंती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यातील 533 पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची पहिली यादी सरकारने जाहीर केली. पण कर्जमाफी पूर्ण होण्यासाठी अजून एक एक महिना लागणार आहे. अखेरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना त्यामुळे वाट पाहावी लागणार आहे. राज्यातील एकूण 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा देण्यात येणार आहे. नियमित कर्ज फेडणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना 50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. 30 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, 12 राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका मिळून 53 बँकांकडून महाआयटी पोर्टलवर माहिती अपलोड केली आहे.

इतर मुद्यांवर अशी दिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर बोलताना त्यांनी तो वरिष्ठांचा निर्णय आहे, केंद्राच्या निर्णयाबद्दल आपण काय सांगू शकतो मोदी यांना जे वाटलं त्याप्रमाणे केलं असेल, असे उत्तर दिले. देवेंद्र फडणवीस दिल्ली वारीबद्दल तुमच्याकडूनच ऐकतोय मी माहिती घेतल्यानंतर बोलेल, असे ते म्हणाले. तर इंदापूर येथील आरोग्य शिबिराचा सर्वांना फायदा होईल असे ते म्हणाले. आरोग्याची काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे, नगराध्यक्ष भरत शहा यांनी खूप चांगले शिबिर या ठिकाणी आयोजित केले आहे.या आरोग्य शिबिराचा फायदा या तालुक्यातील गोरगरीब जनतेला होईल, असे ते म्हणाले.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार