Saamana : ‘महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु’ म्हटल्यावर ‘जीवितास धोका आहे होss’ म्हणून बोभाटा

Shiv sena on BJP : पुढील दोन दिवसांत त्यांचं सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत.

Saamana : 'महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु' म्हटल्यावर 'जीवितास धोका आहे होss' म्हणून बोभाटा
भाजपवर थेट हल्लाबोल!Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 7:22 AM

मुंबई : शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून (Saamana Editorial) बंडखोर आमदारांच्या कृत्यांवर टीका करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे तुकडे करणाऱ्यांचे तुकडे करु, असं शिवसेनेपैकी (Shiv sena Rebel) कुणी बोललं तर यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे होss, असं म्हणून बोभाटा करायचा, अशा शब्दांत सुनावण्यात आलं आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टात (Supreme Court on Maharashtra Political Crisis) पार पडलेल्या सुनावणीवेळी शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांना आमदारांच्या जीविताला धोका असल्याचा युक्तिवाद केला होता. त्यानंतर आता शिवसेनेच्या मुखपत्रातून याला उत्तर देण्यात आलंय. यावेळी भाजपचे रावसाहेब दानवे यांनाही टोला लगवाण्यात आला. एका बाजूला चंद्रकांत पाटील म्हणतात शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही, तर दुसरीकडे रावसाहेब दानवे यांना दोन दिवसात सरकार पडेल, अशी शक्यता वर्तवली होती. त्यावरुनही सामनातून टोला लगावण्यात आला आहे.

नेमकं काय म्हटलंय?

भाजपची अलिकडच्या काळातली वक्तव्य गोंधळात टाकणारी आहेत. एकीकडे चंद्रकांत पाटलांनी सांगयचं, शिवसेनेत जे सुरु आहे, त्याच्याशी आपला संबंध नाही. त्याचवेळी रावसाहेब दानेवांनी अंगाला हळद दावून आणि मुंडावळ्या बांधून बोलायचे, ‘आता फार तर एक -दोन दिवसच विरोधी पक्षात बसू. दोन-तीन दिवसांत राज्यात भाजपचं सरकार येईल’ शिवसेनेच्या बंडाशी संबंध नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला दोन दिवसांत भाजपचं सरकार येईल, असं बोलायचं, त्यामुळे खरं काय? असा सवाल सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

भाजपवर हल्लाबोल!

भाजपशी जे पाट लावू इच्छित आहेत, त्यांनी आपला महाराष्ट्र बाणा एकदा तपासून पाहावाच, असंही सामनातून म्हटलंय. दानवे म्हणतात, त्याप्रमाणे राज्यात पुढील दोन दिवसांत त्यांचं सरकार येईल, बंडखोरांचे नाही. त्यासाठी ते उतावीळ आहेत. पण महाराष्ट्र हे पाप स्वीकारील काय? असा सवालही सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आलाय.

बात स्वाभिमानाची आणि हिंदुत्त्वाची करायची आणि भलतेच उद्योग करुन महाराष्ट्रद्रोह्यांचे हात बळकट करायचे, असं म्हणत शिवसेनेने भाजपसह बंडखोर आमदारांनाही सुनावलंय.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.