पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार

यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली.

पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना, सात वर्षाच्या चिमुरडीवर शेजाऱ्याकडून अत्याचार
crime
| Edited By: | Updated on: Apr 04, 2026 | 6:24 PM

पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरात एक अतिशय संतापजनक घटना समोर आली आहे. एका सात वर्षांच्या निष्पाप चिमुरडीवर ४० वर्षीय शेजाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण परिसरातून संताप व्यक्त होत आहे. मोशी येथील विनायकनगर शिवशंभो कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. या प्रकरणात फिर्यादीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून रामु कुंजल निसाद वय (40) वय या आरोपीला पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत .

राम कुंजल निसाद याने 2 एप्रिलला सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पीडित मुलीला आपल्या खोलीत बोलावलं. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. तसेच, कोणालाही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. धक्कादायक बाब म्हणजे 3 एप्रिलला सकाळी पुन्हा आरोपीने पीडितेला आपल्या खोलीत बोलावून अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली.

खिडकीतून हा सर्व प्रकार पाहिला

यावेळी पीडित मुलीच्या आईने आणि आत्याने खिडकीतून हा सर्व प्रकार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला. आपल्या मुलीसोबत घडणारा हा भयानक प्रकार पाहून त्यांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आरोपी रामकुंजन निसाद विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 64 (1), 65 (2), 74, 351 आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा(पोक्सो) च्या कलम 4, 6, 8 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Follow Us