Pune crime : पत्नीच्या मैत्रीणीसोबत ओळख वाढवून केला बलात्कार, व्हिडिओ आणि फोटो काढत धमकावलंही; पुण्यात गुन्हा दाखल

| Updated on: May 23, 2022 | 11:22 AM

आरोपींनी आधी तरुणीशी ओळख काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी जवळीक वाढवली होती. तिचा विश्वास संपादन करून तिला बाहेर फिरायला नेऊन हा अत्याचार करण्यात आला आहे. दरम्यान, दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून व घाबरून तिने पोलिसांकडे फिर्याद दिली.

Pune crime : पत्नीच्या मैत्रीणीसोबत ओळख वाढवून केला बलात्कार, व्हिडिओ आणि फोटो काढत धमकावलंही; पुण्यात गुन्हा दाखल
औरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पत्नीच्या मैत्रीणीसमवेत ओळख वाढवून तिच्यावर बलात्कार (Physical abuse) करण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. त्याचबरोबर संबंधित तरुणीची छायाचित्रे व व्हिडिओ समाजामाध्यमांमध्ये (Social media) प्रसारित करण्याची धमकी देऊन तिच्याकडून पैसे उकळण्यात आले आहेत. एवढेच नाही, तर पतीच्या मित्रानेही तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी दोघांनाही पोलिसांकडून अटक (Arrest) करण्यात आली आहे. सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22), आशिष विजय कांबळे (वय 23, दोघेही रा. थिटे वस्ती, खराडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पीडित तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. तरुणीच्या नकळक तिचे व्हिडिओ आणि फोटो या आरोपींनी काढले होते. त्यानंतर बदनामी करण्याची धमकी दिली होती.

मेसेज पाठवून वाढवली जवळीक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ श्रीखंडे हा पीडित तरुणीच्या मैत्रीणीचा पती आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीला ‘तू मला खूप आवडतेस’, अशा आशयाचा मेसेज पाठविला होता. त्यानंतर त्याने फिर्यादीशी ओळख वाढवली. तो तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यावेळी त्याने आपल्या मोबाइलमध्ये तरुणीची छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले होते. त्यानंतर त्याने संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्रे समाजामध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी तरुणीला धमकी दिली. आरोपीने या तरुणीकडून 17 हजार रुपये उकळले होते.

हे सुद्धा वाचा

त्रासाला कंटाळून पोलिसांत धाव

सिद्धार्थचा मित्र आशिष यानेदेखील संबंधित तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. आशिषनेही या तरुणीवर बलात्कार केला. त्याने तरुणीला मारहाण करून पैशांची मागणी केली. या दोघांनीही आधी तरुणीशी ओळख काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याशी जवळीक वाढवली होती. तिचा विश्वास संपादन करून तिला बाहेर फिरायला नेऊन हा अत्याचार करण्यात आला आहे. दरम्यान, दोघांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून व घाबरून तिने पोलिसांकडे फिर्याद दिली.