Pune Metro : गरवारे कॉलेज ते दिवाणी न्यायालयापर्यंत विस्तारणार पुणे मेट्रो, कधीपर्यंत सुरू होणार? वाचा सविस्तर…

| Updated on: Jul 20, 2022 | 7:30 AM

केंद्र, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका आणि इतर सर्व शासकीय संस्थांच्या सक्रिय पाठबळामुळे आणि सहकार्यामुळे हे काम शक्य झाल्याचे ब्रिजेश दीक्षित म्हणाले. येत्या काही महिन्यांत दिवाणी न्यायालय स्थानकापर्यंत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू करणार आहे.

Pune Metro : गरवारे कॉलेज ते दिवाणी न्यायालयापर्यंत विस्तारणार पुणे मेट्रो, कधीपर्यंत सुरू होणार? वाचा सविस्तर...
महामेट्रो, पुणे
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे मेट्रो (Pune Metro) लवकरच गरवारे कॉलेज ते दिवाणी न्यायालयापर्यंत आपली सेवा विस्तारित करणार आहे. मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली आहे. वनाझ आणि गरवारे कॉलेज स्थानकांदरम्यानचा रस्ता यावर्षी मार्चमध्ये सुरू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यांतच हा विस्तार होत आहे. पुणे मेट्रोने एका निवेदनात म्हटले आहे, की वनाझ स्टेशन ते सिव्हिल कोर्ट स्टेशनपर्यंतची एलिव्हेटेड लाइन (Elevated line) लवकरच पूर्ण होईल आणि लवकरच या मार्गावर मेट्रो धावेल. या मार्गावरील डेक्कन स्टेशन, छत्रपती संभाजी स्टेशन, पुणे महानगरपालिका स्टेशन आणि दिवाणी न्यायालय स्टेशनचे काम पूर्ण होण्यास थोडा वेळ लागेल. या कामाला गती दिल्याबद्दल महामेट्रोचे (Mahametro) व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

गाठला एक महत्त्वाचा टप्पा

केंद्र, राज्य सरकार, पुणे महानगरपालिका आणि इतर सर्व शासकीय संस्थांच्या सक्रिय पाठबळामुळे आणि सहकार्यामुळे हे काम शक्य झाल्याचे ब्रिजेश दीक्षित म्हणाले. येत्या काही महिन्यांत दिवाणी न्यायालय स्थानकापर्यंत प्रवाशांसाठी मेट्रो सेवा सुरू करणार आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो)द्वारे राबविण्यात येणाऱ्या पुणे मेट्रो प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. पुणे मेट्रोने मंगळवारी रीच 2 मार्गावरील व्हायाडक्टचे काम पूर्ण केल्याने एक महत्त्वाचा टप्पा गाठला. पुणे मेट्रोची एकूण लांबी 33.2 किमी आहे आणि त्यात 30 स्थानके आहेत. यात पाच भूमिगत स्थानके आणि 25 उन्नत स्थानके आहेत.

प्रकल्पाला गती देण्यासाठी, पुणे मेट्रोने मार्गांची विभागणी केली आहे. यात –

  1. रिच 1- पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशन ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन,
  2. रिच 2 – वनाझ मेट्रो स्टेशन ते सिव्हिल कोर्ट मेट्रो स्टेशन
  3. हे सुद्धा वाचा
  4. रिच 3 – रामवाडी मेट्रो स्टेशन ते दिवाणी न्यायालय मेट्रो स्टेशन.
  5. भूमिगत मार्ग 1- स्वारगेट स्टेशन ते दिवाणी न्यायालय स्टेशन
  6. भूमिगत मार्ग 2 – रेंज हिल स्टेशन ते दिवाणी न्यायालय स्टेशन

रिच दोनमधील कामे पूर्ण

पुणे मेट्रोने रिच 2मध्ये सर्व 2,631 प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट बॉक्स सेगमेंट, 41 प्री-स्ट्रेस्ड काँक्रिट I गर्डर आणि एक 48 मीटर स्टील गर्डर स्पॅन म्हणजेच एकूण 296 व्हायाडक्ट स्पॅन आणि 12 डेपो लाइन स्पॅनचे लॉन्चिंग पूर्ण केले आहे, असे निवेदनात वाचले आहे.