पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा; विद्यार्थी आक्रमक, पोलिसांना बोलावलं

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोथरूडच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा झाला आहे. वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याच्या आरोप करत विद्यार्थ्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे.

पुण्याच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा; विद्यार्थी आक्रमक, पोलिसांना बोलावलं
विद्यापीठात राडा
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 01, 2026 | 9:12 PM

पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे. कोथरूडच्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा झाला आहे. वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळालं. विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. कोथरूडच्या  एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमधल्या विविध विभागांतील विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.  राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते देखील या  आंदोलनात सहभागी झाल्याची माहिती समोर येत आहे. या आंदोलनादरम्यान मारहाणीची घटना घडल्याचा देखील आरोप होत आहे. विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला आहे.

पोलिसांना बोलावलं

समोर आलेल्या माहितीनुसार कोथरूड परिसरात असलेल्या एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये जोरदार राडा झाला आहे. वर्षभराच्या परीक्षा देऊनही पुन्हा नापास केल्याचा आरोप विद्यार्थ्यांकडून होत आहे. याच पार्श्वभूमीवर आता विद्यार्थ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. राजकीय पक्षाच्या युवा संघटनेचे कार्यकर्ते देखील या  आंदोलनात सहभागी झाले आहेत. याचदरम्यान मारहाणीची घटना देखील घडल्याचं समोर आलं आहे. परिस्थिती अधिक चिघळल्याने शेवटी आता घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आलं आहे.

घटनेवर विद्यापीठाचं स्पष्टीकरण  

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी सदैव विद्यार्थी हीत जोपासत आलेली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी या वर्षी विशेष परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात पालक आणि विद्यार्थ्यांशी प्रशासनाने वेळोवेळी संवाद साधला होता. विशेष परीक्षेमध्ये काही विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परंतु जे विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले नाहीत, त्यांना बाहेरच्या काही संघटनेने एमआयटी प्रशासनाच्या विरोधात भडकवण्याचे काम केले, जे अतिशय निंदनीय आहे.

आज विद्यापीठात घडलेल्या घटनेत विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यात कोणताही वाद झाला नव्हता. सोशल मीडियावर ज्या पद्धतीने विद्यापीठाच्या विरोधातील क्लिप्स प्रसारित झाल्या, त्या अतिशय चुकीच्या आहेत. यामधून विद्यापीठाची बदनामी केली जात आहे. घटनेमध्ये संबंधित संघटनेच्याच काही कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांवर हात उगारला आहे. यात विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा कसलाही सहभाग नाही. आज घडलेली घटना अवांछित, अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे, असं विद्यापीठ प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us