NIRF rankings 2022 : दर्जा घसरतोय! देशातल्या टॉप दहा शैक्षणिक संस्थांमध्ये पुण्यातल्या केवळ दोनच..! अहवालात काय? वाचा…

| Updated on: Jul 18, 2022 | 7:30 AM

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), जे दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स (IoE) टॅगसाठी मानले जात होते, ते 12व्या स्थानावर घसरले. 2020मध्ये सर्व विद्यापीठांमध्ये संस्थेने देशात 9व्या क्रमांकावर स्थान मिळवले आणि 2021मध्ये पहिल्या 10मध्ये 11व्या स्थानावर घसरले.

NIRF rankings 2022 : दर्जा घसरतोय! देशातल्या टॉप दहा शैक्षणिक संस्थांमध्ये पुण्यातल्या केवळ दोनच..! अहवालात काय? वाचा...
धर्मेंद्र प्रधान (संपादित छायाचित्र)
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : एके काळी ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ (Oxford of the East) म्हणून शहराची ओळख होती. देशातील अग्रगण्य शैक्षणिक केंद्रांपैकी एक म्हणून पुण्याचा टॅग आता झपाट्याने घसरत असल्याचे दिसून येत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या देशभरातील सर्वोच्च संस्थांच्या राष्ट्रीय क्रमवारीत शहरातील शैक्षणिक संस्थांची खराब कामगिरी हे त्याचेच प्रतिबिंब आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) 2022चे निकाल, जे देशभरातील उच्च शैक्षणिक संस्थांना विविध श्रेणींमध्ये स्थान देतात, पुण्यासाठी हे अजिबातच उत्साहवर्धक नाही. NIRFच्या यादीत शहरातील फक्त दोन संस्थांनी पहिल्या 10मध्ये स्थान मिळवले आहे. डी. वाय. पाटील विद्यापीठाने देशातील पहिल्या पाच दंत महाविद्यालयांमध्ये तिसरे स्थान पटकावले आहे, गेल्या वर्षीच्या दुसऱ्या स्थानावरून ते घसरले आहे, तर सिम्बायोसिस लॉ स्कूल देशातील लॉ स्कूलमध्ये 3व्या क्रमांकावर आहे, गेल्या वर्षीच्या नवव्या स्थानावरून सुधारणा करत वरचा क्रमांक मिळवला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची घसरण

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU), जे दोन वर्षांपूर्वी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स (IoE) टॅगसाठी मानले जात होते, ते 12व्या स्थानावर घसरले. 2020मध्ये सर्व विद्यापीठांमध्ये संस्थेने देशात 9व्या क्रमांकावर स्थान मिळवले आणि 2021मध्ये पहिल्या 10मध्ये 11व्या स्थानावर घसरले.

कोविडचे कारण?

विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी कोविड-19 साथीच्या आजाराला घसरणीसाठी अंशत: जबाबदार धरले. “कोविड-19 परिस्थितीमुळे राज्याबाहेरील आणि परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे, विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर बदलले आहे, परिणामी एकत्रित ग्रेडिंगमध्ये फरक आहे. पण मला आशा आहे, की आम्ही भविष्यात आणखी चांगली कामगिरी करू शकू, असे ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘…तर राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक’

पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणाले, की राज्य विद्यापीठ म्हणून काही मर्यादा असल्याने परदेशी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कोलकाताचे जादवपूर विद्यापीठ हे देशातील पहिले सार्वजनिक विद्यापीठ आहे. परंतु त्यांच्याकडे 1,200 शिक्षक आहेत, तर आमच्याकडे केवळ 368 मंजूर शिक्षक आहेत आणि यापैकी 50 टक्के मंजूर पदे रिक्त आहेत. त्यामुळे भविष्यात आपले स्थान टिकवायचे असेल तर राज्य सरकारचे सहकार्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मागील वर्षीपेक्षा सुधारणा

सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीचे लॉ स्कूलने देशातील तिसरे सर्वोत्कृष्ट आणि सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (SIBM) 17व्या क्रमांकावर उडी घेतली. याविषयी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू विद्या येरवडेकर यांनी संशोधन आणि क्षमता निर्माण याविषयी सांगितले. दरम्यान, इतर शैक्षणिक संस्थांमध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे यांना एकूण 24वे स्थान मिळाले आहे, गेल्या वर्षी ते 24वे होते. पहिल्या 100 विद्यापीठांमध्ये, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी दोन्ही 32 (गेल्या वर्षी 38) आणि डी. वाय. पाटील विद्यापीठाने 41व्या क्रमांकावर (गेल्या वर्षी 46) सुधारणा केली.