AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neelam Gorhe : जे गेले त्यांचा शोक करत बसायचं नाही, बंडखोर आमदारांबाबत पुण्यात नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? वाचा…

कायदा नक्की काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. मात्र आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणा दाखवत असेल, तर तो फार काळ टिकत नाही, असा टोला नीलम गोऱ्हे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

Neelam Gorhe : जे गेले त्यांचा शोक करत बसायचं नाही, बंडखोर आमदारांबाबत पुण्यात नेमकं काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे? वाचा...
Neelam Gorhe : राज्यात महिला मुलींच्या अत्याचारात वाढ, पोलिसांनी कडक कारवाई करण्याची नीलम गोऱ्हे यांची मागणी Image Credit source: tv9
| Updated on: Jul 17, 2022 | 3:53 PM
Share

पुणे : जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. जे आपल्यातून काही कारणाने निघून गेले असतील, त्यांचे गैरसमज दूर होतील आणि परत एक नदीचा प्रवाह होईल याची मला खात्री वाटते, असे मत शिवसेनेच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी व्यक्त केले आहे. त्या पुण्यात बोलत होत्या. शिवसेनेतर्फे मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होते. मुलांना साहित्य वाटपाचे काम (Distribution of school materials to students) शिवसेना खूप आधीपासून करत आहे. हजारो मुलांपर्यंत पोहोचण्याचे काम शिवसैनिक करत असतात. मुलांना वह्या-पुस्तके याचे विशेष आकर्षण असते. मधल्या काळात शाळा बंद होत्या. मात्र आता त्या सुरू झाल्या आहेत. अशावेळी गोरगरीब पालकांपुढे वह्या, पुस्तके, डबा आणि इतर शालेय साहित्य कसे आणावे, हा प्रश्न असतो. त्यामुळे शिवसेना (Shivsena) याबाबत नेहमीच पुढाकार घेते, असे त्या म्हणाल्या.

‘…तर ते फार काळ टिकत नाही’

आम्ही आधीपासून 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करत आलो आहोत. पण आता राजकारणाचा प्रांत वाढला आहे. कारण त्यात मोठे वादविवाद सुरू आहेत. मी भगवद्गगीतेवर विश्वास ठेवणारी आस्तिक आहे. त्यामुळे जे गेलेले आहेत, त्यांचा शोक करायचा नाही. कालांतराने त्यांचे गैरसमज दूर होतील आणि पुन्हा नदीचा प्रवाह होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. जो मंत्रिमंडळाचा विस्तार आहे त्या सरकारला ज्यावेळी शक्य होईल, त्यांनी तो करावा. पण यात कायदा नक्की काय आहे हे सर्वोच्च न्यायालय सांगत असते. मात्र आम्ही सांगतो तो कायदा असा अविर्भाव कोणा दाखवत असेल, तर तो फार काळ टिकत नाही, असा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

‘नामांतरप्रश्नी जनतेच्या भावनांचा विचार गरजेचा’

औरंगाबादचे संभाजीनगर तसेच उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतरासारखे विषय हे लोकांच्या मनात रुजलेले आहेत. त्यामुळे अशावेळी अल्पमत, बहुमताचा विचार करायचा नसतो. जनतेच्या मनाचा विचार करायचा असतो. जो करणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी दगडूशेठ हलवाई गणपतीची महाआरती आम्ही करणार आहोत. तेसच यावेळी त्यांना प्रेमरुपी असा मोठा मोदकही भेट देणार आहोत, असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.