AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Gas Price : एलपीजी गॅसच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, थेट…

इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या युद्धाचा फटका अनेक देशांना बसत आहे. थेट एलपीजी गॅसच्या किंमतीत मोठी वाढ भारतात करण्यात आली. व्यावसायिक सिलेंडर बंद असल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात आहेत.

LPG Gas Price : एलपीजी गॅसच्या दरात एकाच दिवसात मोठी वाढ, थेट...
LPG gas price
| Updated on: Mar 11, 2026 | 9:12 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्या युद्धात मोठा फटका जगातील अनेक देशांना बसत आहे. महत्वाचा सागरी मार्ग इराणकडून बंद करण्यात आला. भारताला एलपीजी गॅसचा ज्या मार्गाने पुरवठा होतो, तोच मार्ग बंद झाल्याने भारतात गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणे सध्या पूर्णपणे बंद आहे. यामुळे अनेक हॉटेल चालकांपुढे मोठे संकट आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक लोकांच्या रोजगाराचा मोठा प्रश्न आहे. इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर 60 रूपयांनी घरगुती गॅस सिलेंडरच्या भावात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता एलपीजी रिक्षांच्या इंधन दरात एकाच दिवसात 13 रूपयांची वाढ झाली. 62 रूपये प्रतिलीटर मिळणारा गॅस आता 75 रूपयांवर पोहोचला आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने 28 फेब्रुवारी रोजी मोठा हल्ला इराणवर केला. ज्यानंतर इराणकडून आखाती देशांवर हल्ले करण्यात आले. ज्यामध्ये तेल रिफायनरीवरही हल्ला करण्यात आला.

अनेक देशांनी झालेल्या नुकसानानंतर तेल रिफायनरी बंद करण्याचा निर्णय घेतला. राज्यातील प्रमुख देवस्थानांना देखील गॅस तुटवड्याचा फटका बसताना दिसत आहे. त्यामध्येच आता रिक्षाचा प्रवास देखील महागणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये 13 रूपयांनी मिळणारा 62 रूपये प्रतिलीटर गॅस आता 75 रूपयांवर पोहोचला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये थेट एकाच दिवसात 13 रूपयांनी वाढ झाल्याने रिक्षाचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. राज्यात फक्त व्यावसायिकच नाही तर घरगुती गॅस सिलेंडरचाही तुटवडा निर्माण झाला. अमेरिका आणि इराण युद्धाचा इतका जास्त फटका बसेल, याचा कोणी विचारही केला नव्हता. जगात कच्च्या तेलाची आणि गॅसची मोठी समस्या निर्माण झाली.

इराण आणि अमेरिका युद्ध लवकरात लवकर थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. मात्र, हे युद्ध काही थांबवण्याचे नाव घेत नाही. उलट इराणकडून महत्वाचा समुद्री मार्ग बंद करण्यात आल्याने इराणवर अजून घातक हल्ले अमेरिका करताना दिसत आहे. पुढील काही आठवडे हे युद्ध सुरू राहण्याचे संकेत आहेत. या युद्धामुळे जगातील तेलाच्या किंमती अस्थिर झाल्याचे बघायला मिळत आहे.

Follow Us
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून...
आमदार बच्चू कडूंचं थरारक वॉटरफॉल रॅपलिंग, तब्बल 300 फूट उंचावरून... पहा व्हिडीओ
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार