AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या कारणामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली, अमेरिकेकडून मोठा खुलासा, थेट…

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध टोकाला पोहोचले आहे. मोठे हल्ले केले जात आहेत. तेल डेपो उडवले जात आहेत. यामुळे तेलाचा मोठा तुटवडा निर्माण झाला. त्यामध्येच अमेरिकेकडून अत्यंत मोठा दावा करण्यात आला.

या कारणामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली, अमेरिकेकडून मोठा खुलासा, थेट...
America Russia India
| Updated on: Mar 11, 2026 | 7:53 AM
Share

इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून इराणवर 28 फेब्रुवारी 2026 रोजी मोठा हल्ला केला. युद्ध सुरू झाल्यानंतर 24 तासाच्या आत इराणच्या सर्वाेच्च नेत्याला ठार करण्यात आले. यानंतर अमेरिकेने धक्कादायक खुलासे करत म्हटले की, आमच्याकडे गेल्या एक महिन्यापासून प्रत्येक हालचाल खामेनेईची होती. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन लष्कर तळावर इराणकडून मोठे हल्ले करण्यात आले. थेट त्यांची रडार स्टिटम खराब करण्यात आली. या युद्धादरम्यान अमेरिकेकडून अत्यंत मोठी घोषणा करण्यात आली आणि एक महिन्याकरिता आम्ही भारताला रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याची परवानगी देत असल्याचे सांगण्यात आले. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता अनेक निर्बंध घालण्यात आले. 50 टक्के टॅरिफ अमेरिकेने भारतावर लावला होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केल्यानंतर हा टॅरिफ कमी करण्यात आला.

अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची सूट नक्की का दिली? यावरून चर्चा रंगताना दिसल्या. अमेरिका इराण युद्धात जगातील अनेक देशात तेलाचा तुटवडा असून महत्वाचा समुद्री मार्गही इराणकडून बंद करण्यात आला. आता अमेरिकेने भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची सूट का दिली याबद्दल थेट भाष्य करत त्यामधील कारणही सांगितले आहे.

व्हाईट हाऊसमधून पत्रकारांसोबत बोलताना प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी म्हटले की, आम्ही या निर्णयापर्यंत याकरिता पोहोचलो की, भारत कायमच आमचा चांगला मित्र राहिला आहे, त्यांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली होती. इराणी लोकांमुळे जगभरातील तेल पुरवठा अस्थिर झाला आहे. हा तेल पुरवठा सुरळीत करण्याकरिता पूर्ण प्रयत्न केली जात आहेत.

त्याकरिता आम्ही भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची परवानगी दिली. विशेष म्हणजे भारताला तेल पुरवठा केल्यानंतरही रशियाचा काही विशेष फायदा होणार नाही. अमेरिका आणि इराण युद्ध थांबवण्याचे काही संकेत नाहीत. या युद्धाचा थेट फटका अनेक देशांना बसताना दिसत आहे. त्यामध्येच मोठ्या हल्ल्यांची धमकी दिली जात आहे.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?