AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : ‘एक दिवस तूच आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील..’, MDS च्या विद्यार्थिनीने का संपवलं आयुष्य ?

मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एमडीएस विद्यार्थिनी स्तुती सोनवणे हिने मानसिक छळ आणि विषारी नातेसंबंधातून आत्महत्या केली. प्रियकराने केलेल्या चारित्र्यहीनतेचे आरोप आणि छळामुळे ती खचल्याचे तिच्या सुसाईड नोटमधून समोर आले. श्रद्धा वालकर प्रकरणाचा उल्लेख असलेल्या या घटनेमुळे नातेसंबंधातील वाढता मानसिक ताण आणि हिंसाचारावर प्रकाश पडला असून, पोलिसांचा तपास सुरू आहे.

Mumbai Crime  : ‘एक दिवस तूच आम्हाला फ्रिजमध्ये सापडशील..’, MDS च्या विद्यार्थिनीने का संपवलं आयुष्य ?
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: Mar 11, 2026 | 9:20 AM
Share

मुंबई स्वप्नांचं शहर.. मायनागरी… याच मायानगरीतील अँटॉप हिल परिसरात एक अतिशय धक्कादायक, हादरवणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तिथे मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (एमडीएस) ची विद्यार्थिनी स्तुती सोनवणे ( वय 24) हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. स्तुती तिच्या आईवडिलांसोबत आणि बहिणीसोबत राहत होती.आत्महत्येनंतर पोलिसांना तिच्या खोलीत सहा पानांची मोठी सुसाईड नोट सापडल्याने या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. टॉक्सिक रिलेशनशिप आणि मानसिक छळाची भयानक कहाणी त्यातून उघड झाली आहे.

सकाळी 11 पर्यंत स्तुति तिच्या खोलीतून बाहेर आली नाही, घरच्यांनी तिला खूप हाका मारल्या, दारही बराच वेळ वाजवलं. मात्र आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. काही अघटित तर घडलं नाही ना, या भीतीने घरच्यांनी तिच्या रूमचा दरवाजा तोडला, मात्र समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. स्तुतीने गळफास लावून घेतला होता, तिचा मृतदेह समोर लोंबकळत होता. घरच्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं.

सुसाईड नोटमध्ये श्रद्धा वालकर केसचा उल्लेख

मृत्यूपूर्वी लिहीलेल्या नोटमध्ये स्तुतीने बॉयफ्रेंडसोबत तिच्या बिघडलेल्या नात्याचा उल्लेख केला. तिचा पार्टनर सतत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा आणि तिचा मानसिक छळ करायचा असं तिने त्यात लिहीलं होतं.

मात्र सगळ्यात धक्कादायक खुलासा तर पुढे होता. स्तुतीचे मित्र तिला मजेमजेत वॉर्निंग द्यायचे, बाई गं सांभाळून रहा, नाहीतर कदाचित तुझे तुकडेही फ्रीजमध्ये सापडतील, असं तिने नोटमध्ये लिहीलं होतं. हा संदर्भ थेट दिल्लीतील कुख्यात श्रद्धा वालकर हत्याकांडाशी निगडीत होता. तिच्या मित्र-मैत्रीणींनी व्यक्त केलेली ही भीती फक्त मजेत नव्हती, तर त्यातून स्तुतीच्या नात्यातील कटुता आणि हिंसाचाराची शक्यता दर्शवत होती. प्रियकराच्या गैरवर्तनामुळे आणि वारंवार फसवणूकीच्या आरोपांमुळे ती खचून गेली होती असंही स्तुतीने तिच्या चिठ्ठीत लिहिलं होतं.

पोलिसांची कारवाई आणि तपास

याप्रकरणी अँटॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. ते आता स्तुतीच्या प्रियकराचा जबाब नोंदवून घेत असून आणि त्याच्या फोन कॉल रेकॉर्डचीदेखील तपासणी करण्यात येत आहे. हे आत्महत्येला प्रवृत्त करण्याचे प्रकरण आहे का याचाही तपास करण्यात येत आहेत. तरुणांमधील वाढता मानसिक ताण आणि नातेसंबंधांमधील वाढता हिंसाचारावर या घटनेने प्रकाश टाकला आहे.

Follow Us
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
Sanjay Raut EXCLUSIVE | ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत संजय राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
Sushma Andhare | राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही भ्रमात नाही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
Omraje Nimbalkar | धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या एका निर्णयाने बदलणार राजकीय गणित, घडामोडींना वेग
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
Viral Photos | गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
Jayant Patil UNCUT | सरकार कंगाल झालंय का? जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; भ्रष्टाचारावरून घणाघात!
एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण... जाधवांनी अधिवेशनाआधीच सरकारला घेरलं
Bhaskar Jadhav UNCUT | एल निनो, दुष्काळ आणि लाडकी बहीण...भास्कर जाधवांनी अधिवेशनाआधीच फडणवीस सरकारला घेरलं!
चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा
Bhaskar Jadhav । चहा नको, उत्तर द्या! मुख्यमंत्री फडणवीसांच्या चहापानाला MVAचा ठेंगा; भास्कर जाधवांचा सरकारवर थेट हल्लाबोल
वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर....
मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार
मोठी घडामोड! ओमराजेंचा उद्धव ठाकरेंना निरोप; सोमवारी मातोश्रीवर होणार निर्णायक भेट
ओमराजेंच्या निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, तर ठाकरे गटाची मनधरणी सुरूच
Omraje Nimbalkar | ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य, रोखण्यासाठी ठाकरे गटाची मनधरणी सुरूच