AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या....

मोठी बातमी! वडील बंडखोर, पण मुलगी ठाकरेंसोबत! राजुल पाटील थेट मातोश्रीवर, भूमिका स्पष्ट करत म्हणाल्या….

| Updated on: Jun 21, 2026 | 2:44 PM
Share

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली आहे. बंडखोर खासदार संजय दीना पाटील यांच्या कन्या राजुल पाटील यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजुल पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

राजुल पाटील म्हणाल्या की, “मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना भेटण्यासाठी आले होते. माझी भूमिका मी स्पष्ट केली आहे. मी अजूनही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातच आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहे.”

यावेळी त्यांनी आपल्या वडिलांच्या राजकीय निर्णयाबाबतही भाष्य केले. “आमच्या कुटुंबात प्रत्येकाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची मुभा आहे. संजय दीना पाटील त्यांचा निर्णय घेतील, पण मी माझा निर्णय घेतला असून मी पक्षासोबतच आहे,” असे त्या म्हणाल्या.

राजुल पाटील यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेनेतील सध्याच्या राजकीय घडामोडींना नवे वळण मिळाले आहे. बंडखोर खासदारांच्या भूमिकेवर चर्चा सुरू असतानाच त्यांच्या कन्येने सार्वजनिकरित्या उद्धव ठाकरे यांना पाठिंबा जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटातील खासदारांच्या बंडखोरीनंतर सुरू झालेल्या राजकीय हालचालींमध्ये ही भेट महत्त्वाची मानली जात असून, आगामी काळातील राजकीय समीकरणांवर तिचा परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे.

Published on: Jun 21, 2026 02:44 PM

Follow Us