AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel US War : युद्धात अमेरिकेचा इराणवर जबरदस्त घातक वार, एका झटक्यात संपवून टाकली 10…

Iran Israel US War : पश्चिम आशियातील स्थिती वेगाने बिघडत चालली आहे. इराणने प्रत्युत्तराची कारवाई करताना आखातामधील अमेरिकन सैन्य बेस, दूतावास आणि तेल रिफायनरीजना लक्ष्य केलं आहे.

Iran Israel US War : युद्धात अमेरिकेचा इराणवर जबरदस्त घातक वार, एका झटक्यात संपवून टाकली 10...
Donald Trump
| Updated on: Mar 11, 2026 | 9:32 AM
Share

पश्चिम आशियात मोठा तणाव आहे. इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यु्द्धात टोकाचा संघर्ष सुरु आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये तणाव सतत वाढत चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कठोर शब्दात इशारा दिला आहे. “इराणने या समुद्रीमार्गात भूसुरुंग पेरले असतील तर त्यांना, आधी पाहिले नसतील असे भयानक परिणाम भोगावे लागतील. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये भूसुरुंग पेरल्याची माहिती नाहीय. पण त्यांनी असं केलं असेल तर ते भूसुरुंग हटवले पाहिजेत. इराणने हे सुरुंग हटवले तर ते योग्य पाऊल ठरेल” असं ट्रम्प आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हणाले आहेत.

त्यानंतर काही वेळाने ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन एक दावा केला. “मला सांगताना आनंद होतोय की, मागच्या काही तासात आम्ही भूसुरुंग पेरणाऱ्या 10 जहाजांना पूर्णपणे नष्ट केलं आहे. यापुढेही अशी जहाजं नष्ट करु” असं ट्रम्प सोशल मीडिया पोस्टवर म्हणाले. “स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये भूसुरुंग पेरण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुठल्याही जहाजाला पूर्णपणे नष्ट करण्यासाठी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्यांविरोधात वापरलेली टेक्निक आणि मिसाइल क्षमतेचा उपयोग करत आहोत” असं ट्रम्प म्हणाले.

युद्ध कधी थांबणार?

अमेरिकी सैन्याच्या यूएसए सेंट्रल कमांडने सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर केलाय. “अमेरिकन सैन्य समुद्रात शक्ती प्रदर्शन करुन आंतरराष्ट्रीय जहाजांना त्रास देणाऱ्या इराणी शासनाची क्षमता कमजोर करत आहेत. अनेक वर्षांपासून इराणी सैन्य त्या भागातून होणाऱ्या जलवाहतुकीसाठी धोकादायक बनलं आहे” असं यूएसए सेंट्रल कमांडने म्हटलं आहे. मंगळवारच्या पत्रकार परिषदेत व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट म्हणाल्या की, “अमेरिकेने इराणमध्ये सैन्य पाठवण्याचा पर्याय नाकारलेला नाही. अमेरिकेने या ऑपरेशनला एपिक फ्यूरी नाव दिलं आहे. उद्दिष्टय प्राप्तीनंतरच हे अभियान थांबेल”

स्थिती वेगाने बिघडत चालली आहे

पश्चिम आशियातील स्थिती वेगाने बिघडत चालली आहे. इराणने प्रत्युत्तराची कारवाई करताना आखातामधील अमेरिकन सैन्य बेस, दूतावास आणि तेल रिफायनरीजना लक्ष्य केलं आहे. संयुक्त अरब अमिरात, सौदी अरेबिया, कतर, कुवैत, बहरीन आणि जॉर्डन या देशांवर इराणकडून हल्ले सुरु आहेत.

Follow Us
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?