AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BBM6: अरे देवा.. तो पुन्हा बिग बॉसच्या घरात..; राकेश बापटबद्दल काय म्हणाली पूर्व पत्नी?

अभिनेता राकेश बापट सध्या 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाला असून त्याची पूर्व पत्नी रिधी डोग्राने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. राकेश आणि रिधी यांनी लग्नाच्या आठ वर्षांनंतर 2019 मध्ये घटस्फोट घेतला होता.

BBM6: अरे देवा.. तो पुन्हा बिग बॉसच्या घरात..; राकेश बापटबद्दल काय म्हणाली पूर्व पत्नी?
Raqesh Bapat and Ridhi DograImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 18, 2026 | 4:32 PM
Share

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत एजेची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला मराठमोळा अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठीच्या घरात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी खेळतोय. राकेशने याआधी बिग बॉस हिंदीमध्येही भाग घेतला होता आणि त्यानंतर आता तो मराठीतही चांगला खेळ खेळताना दिसतोय. राकेशची पूर्व पत्नी आणि अभिनेत्री रिधी डोग्राला नुकतंच इन्स्टाग्रामवरील ‘आस्क मी एनिथिंग’ सेशनदरम्यान त्याच्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे. घटस्फोटानंतरही राकेश आणि रिधी यांच्यात मैत्रीपूर्ण नातं आहे. याच मैत्रीखातर तिने राकेशला कायम पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय.

काय म्हणाली रिधी डोग्रा?

“मला राकेशचा खूप अभिमान आहे. तो जबरदस्त परफॉर्म करतोय. आम्हाला आणि मला त्याची खूप काळजी वाटत होती की, अरे देवा.. तू पुन्हा बिग बॉसच्या घरात जात आहेस. पण यावेळी तो खूप छान कामगिरी करतोय. तो जसा आहे तसाच तिथे वागतोय. आम्हाला जो राकेश माहीत आहे, तोच तिथे दिसतोय. मला खूप आनंद आहे की तो स्वत:च्या नियमांनुसार खेळ खेळतोय. राकेशला माझ्याकडून शुभेच्छा आहेतच, पण यावेळी त्याला अशा वेगळ्या पाठिंब्याची विशेष गरज वाटत नाही. तरीसुद्धा मी नेहमीच त्याच्यासाठी चिअर करत राहीन,” अशा शब्दांत रिधी व्यक्त झाली.

View this post on Instagram

A post shared by Ridhi Dogra (@iridhidogra)

“राकेश माझा पूर्व पती असला तरी मला एखादी समस्या सतावत असेल तर मी त्याची मदत आवर्जून घेते. तो माझा पूर्व पती असला तरी माझा सर्वांत जवळचा मित्रसुद्धा आहे”, असं रिधीने एका मुलाखतीत सांगितलं होतं. राकेश आणि रिधी यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या आठ वर्षांनंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एका मालिकेदरम्यान या दोघांची भेट झाली होती आणि सेटवर ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले होते. काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. परंतु हे नातं फार काळ टिकू शकलं नाही.

Follow Us
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती