AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय

अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय

| Updated on: Jul 25, 2026 | 5:58 PM
Share

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते.

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. प्रधानांचा राजीनामा झाला तरी आंदोलन सुरु राहिल असं अभिजीत दीपके याने सांगितलं होतं. मात्र आता त्याच्या प्रवक्त्यांनी आंदोलन मागे घेणार अशी जाहीर घोषणा केली आहे,

दिल्लीत आज मोठ्या घडामोडी घडताना पाहयला मिळाल्या. मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दोन मागण्यासाठी सीजेपीच्या शिष्टमंडळाने मंत्री जे. पी. नड्डा. आणि जितेंद्र सिंह यांची भेट घेतली. याभेटीनंतर सीजेपी शिष्टमंडळाने संयुक्त पत्रकार परिषद घेत सर्व मागण्या मान्य झाल्या असून आंदोलकांनी शांतपणे घरी जावं. इतर सर्व आंदोलनंदेखील मागे घ्यावी अशी मागणी केली आहे.

Published on: Jul 25, 2026 05:58 PM

Follow Us