AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान

Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान

| Updated on: Jul 25, 2026 | 5:52 PM
Share

नीट पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात उभारलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर मोठं यश मिळालं असून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं. शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उपोषण केलं, तर कॉक्रोच जनता पार्टीनेही या आंदोलनात सक्रिय भूमिका घेत सरकारवर दबाव वाढवला. अनेक दिवसांच्या संघर्षानंतर सरकारने आंदोलकांशी संवाद सुरू केला आणि अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला.

दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातही ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. उद्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त नेतृत्वाखाली मुंबईत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतरही हा मोर्चा नियोजितप्रमाणेच काढण्यात येणार असल्याचं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलं.

याच पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांचं आणि देशातील तरुणाईचं अभिनंदन केलं. यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत सरकारवर जोरदार टीका केली.

“जेनजीने सरकारच्या झिंज्या उपटल्या आहेत. सरकारला पूर्णपणे जमिनीवर आणलं आहे,” अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आंदोलनाच्या यशाचं कौतुक करत सरकारला टोला लगावला. उद्याच्या मोर्चासाठी शिवाजी पार्क येथील वीर सावरकर मार्गावर व्यासपीठ उभारण्यात येणार असून तेथूनच सर्वजण एकत्र येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे म्हणाले, “हा तरुणाईचा खूप मोठा विजय आहे. अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संघर्षाचा यात मोठा वाटा आहे. कोणत्याही प्रश्नावर मस्तवाल उत्तरं देणाऱ्या सरकारला अखेर माघार घ्यावी लागली. एवढं मोठं आंदोलन देशभर उभं राहिलं, त्याचा जल्लोष झाला पाहिजे.”

पुढे बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत, “हा जो रोष आहे तो केवळ धर्मेंद्र प्रधानांपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो पंतप्रधानांपर्यंत पोहोचला आहे. मी कालही हेच म्हटलं होतं. यापुढे अभिजीत दीपके जे निर्णय घेतील, त्यांना आमचा संपूर्ण पाठिंबा असेल,” असंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jul 25, 2026 05:51 PM

Follow Us