AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर PM मोदींची पहिली पोस्ट, पण…

PM Modi Post : धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर PM मोदींची पहिली पोस्ट, पण...
PM Modi 1st post After Pradhan ResignImage Credit source: Google
| Updated on: Jul 25, 2026 | 10:47 PM
Share

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधानांची ही पोस्ट सारनाथबाबत आहे. पंतप्रधानांनी यूनेस्कोच्या एका पोस्टला पुन्हा शेअर करत ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचे म्हटले आहे. या पोस्टमध्ये सारनाथच्या प्राचीन बौद्ध तीर्थस्थळाचा यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण! उत्तर प्रदेशातील सारनाथचा यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा मला खूप आनंद आहे. सारनाथचा भगवान बुद्धांशी अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यांचे ज्ञान, करुणा आणि मैत्रीचा शाश्वत संदेश आजही संपूर्ण जगाला प्रेरणा देतो. ही मान्यता भारताच्या समृद्ध सभ्यता आणि आध्यात्मिक वारशाचा गौरव करणारी आहे. जगभरातील अधिकाधिक लोकांना सारनाथला भेट देण्यासाठी आणि भगवान बुद्धांच्या आदर्शांशी जोडले जाण्यासाठीही यामुळे प्रेरणा मिळेल.’

भारतातील 45वे जागतिक वारसा स्थळ

सारनाथ हे उत्तर प्रदेशातील चौथे आणि देशातील 45वे यूनेस्को जागतिक वारसा स्थळ ठरले आहे. सुमारे 28 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भगवान बुद्धांनी पहिला धर्मोपदेश दिलेली पवित्र भूमी सारनाथला यूनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित यूनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 48व्या अधिवेशनात ही घोषणा करण्यात आली. यामुळे बौद्ध धर्मातील सर्वांत पवित्र स्थळांपैकी एक असलेल्या सारनाथला जागतिक वारशाच्या सर्वोच्च व्यासपीठावर नवी ओळख मिळाली आहे.

युनेस्कोच्या या निर्णयामुळे उत्तर प्रदेशातील बौद्ध सर्किटला आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाच्या नकाशावर आणखी बळकटी मिळेल. 3 जुलै 1998 रोजी सारनाथचा यूनेस्कोच्या संभाव्य यादीत समावेश करण्यात आला होता. आता जवळपास 28 वर्षांनंतर मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेशातील तीन जागतिक वारसा स्थळांमध्ये ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर सीकरी यांचा समावेश होता. आता सारनाथचा समावेश झाल्यामुळे उत्तर प्रदेशाची जागतिक वारसा ओळख आता आणखी विस्तारली आहे.

जागतिक वारसा स्थळात सारनाथमधील पुरातत्त्वीय अवशेषांचा समावेश

यूनेस्कोने मान्यता दिलेल्या या जागतिक वारसा स्थळामध्ये चौखंडी स्तूप आणि सारनाथमधील पुरातत्त्वीय अवशेषांचा समावेश आहे. ही दोन्ही स्थळे एकमेकांपासून सुमारे 626 मीटर अंतरावर आहेत. चौखंडी स्तूप हा भगवान बुद्ध आणि त्यांच्या पाच प्रथम शिष्यांच्या भेटीच्या स्मृतीचे प्रतीक आहे. तर पुरातत्त्वीय परिसरात धामेक स्तूप, धर्मराजिका स्तूप, प्राचीन विहारांचे अवशेष आणि अशोक स्तंभ यांसारख्या महत्त्वपूर्ण वास्तूंचा समावेश आहे.

सारनाथमध्ये गौतम बुद्धांनी दिला होता पहिला उपदेश

सारनाथ ही अशी पवित्र भूमी आहे, जिथे भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर मानवतेला आपला पहिला उपदेश देऊन धर्मचक्र प्रवर्तनाची सुरुवात केली होती. बौद्ध धर्मातील सर्वांत पवित्र तीर्थस्थळांपैकी एक असलेल्या सारनाथचा प्राचीन बौद्ध ग्रंथांमध्ये ऋषिपत्तन या नावाने उल्लेख करण्यात आला आहे. याच ऐतिहासिक स्थळी भगवान बुद्धांनी आपल्या पहिल्या पाच शिष्यांना धर्माचा उपदेश देत करुणा, शांतता आणि मध्यम मार्गाचा संदेश संपूर्ण मानवतेपर्यंत पोहोचवला. 2,600 वर्षांपासून सारनाथ हे बौद्ध श्रद्धा आणि तीर्थपरंपरेचे प्रमुख केंद्र राहिले आहे. आजही हे स्थळ बौद्ध मठीय जीवन, प्राचीन स्थापत्यकला आणि समृद्ध कलावारशाचे साक्षीदार मानले जाते.

Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं