AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamne Samne: ‘आमने सामने’ नाटकातून रोहन-केतकीला तडकाफडकी का काढलं? लीना भागवत स्पष्टच बोलल्या..

'आमने सामने' या नाटकातील रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी केलेल्या आरोपांवर आता लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी उत्तर दिलं आहे. नाण्याची दुसरी बाजू त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत मांडली आहे.

Aamne Samne: 'आमने सामने' नाटकातून रोहन-केतकीला तडकाफडकी का काढलं? लीना भागवत स्पष्टच बोलल्या..
लीना भागवत, मंगेश कदम, रोहन गुजर आणि केतकी पालवImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 28, 2026 | 1:25 PM
Share

‘आमने सामने’ हे मराठी नाटक सध्या त्यातील कलाकारांच्या आरोपांमुळे चर्चेत आलं आहे. या नाटकातील रोहन गुजर आणि केतकी पालव या कलाकारांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत कोणतीही पूर्वसूचना न देता नाटकातून काढून टाकल्याचं म्हटलंय. गेली सात-आठ वर्षे हे नाटक करतोय आणि तब्बल 670 प्रयोग केले, केतकीनं 520 प्रयोग केले. दोघांनाही एक छानसं गुडबायही केलेलं नाही, अशी खंत रोहनने बोलून दाखवलं. मानधन वाढवून मागितलं म्हणून काढून टाकल्याचं कारण दोघांनी सांगितलं. त्यावर आता नाटकाचे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी त्यांची बाजू मांडली आहे. नाण्याची दुसरी बाजू असं लिहित त्यांनी रोहन आणि केतकीच्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे.

या व्हिडीओत लीना म्हणाल्या, “आमने सामने या नाटकात मी काम करते. आम्ही दोघंही त्या नाटकाचे निर्मातेही आहोत. आमच्या आधीच्या सहकलाकारांनी काल जो व्हिडीओ पोस्ट केला, तो आम्ही पाहिला. दिवसभर त्याच्यावरच्या प्रतिक्रियाही पाहिल्या. त्यानंतर आता आम्हाला काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. आमची बाजू.. असं म्हणा हवं तर. मानधन वाढवून मागितलं म्हणून तडकाफडकी काढून टाकलं, अशा आशयाचा एकदंर सूर तिथे दिसतो. पण या सगळ्यात एक शब्द राहून गेलाय आणि तो म्हणजे तिसऱ्यांदा मानधन वाढवून मागितलं.”

“सुरुवातीला जेव्हा आमच्याकडे त्यांचा मानधन वाढीचा प्रस्ताव आला होता, तो अगदीच मामुली होता. कारण नाटकही तेव्हा चालू नव्हतं. इतकी वर्षे झाल्यानंतर तो करणं गरजेचंच होतं. आम्ही हो म्हटलं. त्यानंतर मात्र जेव्हा नाटक चांगलं चालू लागलं, त्याच्या चार ते पाच महिन्यातच पुन्हा एकदा मानधनवाढीचा प्रस्ताव आमच्याकडे आला,” असं त्यांनी पुढे सांगितलं. यावेळी मंगेश कदम म्हणाले, “दुसऱ्यांदा प्रस्ताव आला तेव्हा मीच त्यांच्याशी बोललो. मी दोघांनाही विचारलं की तुमची अपेक्षा काय आहे? त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या आणि आम्ही त्या लगेचच मान्य केल्या.”

पहा व्हिडीओ

या संदर्भातले सगळे मेसेज लिखित स्वरुपात असल्याचं लीना यांनी सांगितलं. “मानधनवाढीनंतर परत एकदा प्रयोग सुरळीत सुरू झाले आणि वर्ष व्हायच्या आधीच कॅनडा दौऱ्यादरम्यान पुन्हा आमच्याकडे मानधनवाढीचा प्रस्ताव आला,” असा दावा त्यांनी केला. यावर मंगेश कदम यांनी सांगितलं, “तेव्हा मला जरा धक्का बसला, कारण दुसऱ्यांदा जेव्हा मानधन वाढवलं होतं, तेव्हा मी त्यांना विचारलं होतं की तुमच्या आणखी काही अपेक्षा आहेत का? तेव्हा त्या दोघांनीही आम्हाला सांगितलं होतं की, जेवढं वाढवलंय ते पुरेसं आहे. बाकी काहीच समस्या नाही.”

दरवर्षी इतकी मानधनवाढ शक्य नसल्याचं लीना यांनी स्पष्ट केलं. याविषयी त्या म्हणाल्या, “त्या मानधनवाढीसोबतच आम्हाला असं सांगण्यात आलं होतं की, ही मानधनवाढ आम्हाला प्रत्येक वर्षी अपेक्षित आहे. मराठी रंगभूमीवरच्या कुठल्याही निर्मात्याला अशी दरवर्षी नाटकातल्या कलाकारांची मानधनवाढ करणं हे शक्य होईल की नाही, माहीत नाही. पण आम्हाला शक्य झालं नाही. म्हणून आम्ही नाही म्हटलं. ज्या गोष्टीचा त्यांना अपेक्षित असलेला मोबदला निर्माता म्हणून आम्ही देऊ शकत नाही, ते काम त्यांच्याकडून करवून घेणं हे योग्य नाही. म्हणूनच थांबायचा निर्णय घेतला. यापुढे यासंदर्भात कोणतेही व्हिडीओ किंवा पोस्ट आमच्याकडून केले जाणार नाहीत. मला वाटतं की आम्ही आमची बाजू सांगायचा प्रयत्न केलेला आहे.”

लीना आणि मंगेश यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आणि मराठी कलाविश्वातील विविध कलाकारांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘तुम्हाला अधिक बळ मिळो’, असं अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं लिहिलं आहे. तर ‘नाटक घडत राहो’, असं चेतन वडनेरे यानं म्हटलंय.

Follow Us
कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
Kaustubh Gawade : कमी वय, मोठी संधी अन् विजय, कौस्तुभ गावडेंनी टीकेला दिलं उत्तर; शिक्षक मतदारसंघात भाजपची बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... शिक्षक नेते...
Maharashtra MLC Election 2026 Result : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ऐनवेळी पाठिंबा दिल्याने... सचिन सानप काय म्हणाले?
कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत...
Kaustubh Gawde MLC Result : कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर; स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत गुलालाची उधळण
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून...
बॅलेट पेपरवरही महायुतीची आघाडी; भाजपनं विरोधकांना निवडणूक निकालातून दिलं प्रत्युत्तर?
पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये मविआच्या हर्षदा जाधव विजयाच्या उंबरठ्यावर
जाधव विरुद्ध जाधव; कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
Pune Padvidhar Matdarsangh Result 2026 : जाधव विरुद्ध जाधव; पुणे पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? अंतिम निकालाकडे लक्ष
विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव
Maharashtra MLC Result 2026 Complete : विधानपरिषद निवडणुकीत पुण्यात मोठा ट्विस्ट; दोन माजी शिक्षक आमदारांचा पराभव, सानप-गावडे यांच्यात चुरस
पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा दावा
Sanjay Raut : पुणे, अमरावती, नाशिकमध्ये १०-१० हजार रुपये वाटले; संजय राऊतांचा खळबळजनक दावा
मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर तर....
Marathwada MLC Election Results 2026 : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात चुरस वाढली; प्रतापसिंह पाटील आघाडीवर, सतीश चव्हाण पिछाडीवर
प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरण तापलं, घोडबंदर रोडवर रास्ता रोको; मीनाक्षी शिंदे, राजेंद्र शिंदेंच्या अटकेची मागणी