आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे… बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते
Dharmendra Pradhan Resign | धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. प्रधान यांनी मंत्रिपदाची खुर्ची सोडल्याने संपूर्ण देशात जल्लोष केला जात आहे. गेल्या साधारण महिन्याभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर हजारो तरुण आंदोलन करत होते. कॉकरोच जनता पार्टीच्या म्हणजेच सीजेपीच्या नेतृत्त्वात हे आंदोलन सुरू होते. अखेर या लढ्याला यश मिळाले आहे. धमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता त्यांची जागा कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानामुळे मात्र एकच खळबळ उडाली आहे.
ठाकरे म्हणाले, की “आंदोलनावेळी आंदोलकांंवर लाठ्या-काठ्या चालवल्या गेल्या. इतकेच नाही तर एक तरुणी मला अत्यंत दुःखी होत म्हणाली तिच्या कपड्यांवरही हात लावला गेला. जंतर मंतरवरील आंदोलनात अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यावर गुन्हे मागे होणार की नाही हे आता शहांनी सांगावं नाही तर तरुणांचा मोर्चा शहांकडे वळेल.”
Published on: Jul 25, 2026 05:28 PM
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...

