Vanity Salon | सलूनची चिंता सोडा, आता व्हॅनिटी सलून तुमच्या दारी

निटी व्हॅनच्या धर्तीवर व्हॅनिटी सलून तुमच्या दारात येऊन उभी राहणार आहे.

Vanity Salon | सलूनची चिंता सोडा, आता व्हॅनिटी सलून तुमच्या दारी
| Updated on: Dec 18, 2020 | 4:19 PM

पिंपरी चिंचवड : व्हॅनिटी व्हॅनच्या धर्तीवर व्हॅनिटी सलून तुमच्या दारात येऊन उभी राहणार आहे (Vanity Salon In Pimpari-Chinchwad). पिंपरी-चिंचवडमध्ये अशी सुविधा सुरु झाली आहे आणि ग्राहकही त्याचा लाभ घेत आहेत (Vanity Salon In Pimpari-Chinchwad).

कोरोनाच्या भीतीने आज ही नागरिक बाहेर पडताना हजारदा विचार करावा लागतो. अशात सलूनमध्ये जायचा विषय ऑप्शनला पडतो. पण, आता काळजी करु नका. कारण, व्हॅनिटी व्हॅनच्या धर्तीवर व्हॅनिटी सलून तुमच्या दारात येऊन उभी राहणार आहे.

व्हॅनिटी व्हॅन, सेलब्रिटींच्या मेकअपचं ठिकाण. मात्र, ही सुविधा सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरची आहे. मात्र, आता टेन्शन घेऊ नका. कारण व्हॅनिटी व्हॅनच्या धर्तीवर आता व्हॅनिटी सलूनची पिंपरी चिंचवडमध्ये उभारणी करण्यात आली आहे. खिशाला परवडणाऱ्या किंमतीत ते ही थेट दारात ही सुविधा उपलब्ध होते आहे.

कोरोनाच्या कठीण काळात चक्क दारातच लक्झुरीअस सलून आल्याने ग्राहकांनांही सेलिब्रिटीचा फील येतो आहे.

व्हॅनिटी व्हॅनमध्ये एकदा तरी मेकअप करायचा असा विचार अनेकांच्या मनात येतो. पण त्याचे दर पाहताच हा विचार सामान्यांनी न केलेलाच बरा, अशी म्हणायची वेळ येतो. पण व्हॅनिटी सलूनने ही संधी उपलब्ध करुन दिली. ज्यांचा लाभ तुम्ही ही नक्की घ्या.

Vanity Salon In Pimpari-Chinchwad

संबंधित बातम्या :

Beauty Tips | डोक्याला खाज येतेय, त्रस्त आहात?, ‘या’ आयुर्वेदिक टिप्स ट्राय करु शकता

Beauty Tips | ‘चारकोल’ने त्वचा बनेल नितळ, ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा!

केसगळती आणि डँड्रफचा वैताग आलाय?, मग ‘ही’ भन्नाट युक्ती वापरा

Baking Soda Scrub | हिवाळ्यात त्वचा निस्तेज झाली आहे, तर बेकिंग सोडा स्क्रब नक्की ट्राय करा