ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे निधन; साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होऊनही नाकारला होता पुरस्कार

| Updated on: Jul 22, 2022 | 7:19 PM

साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार त्यांनी नाकारल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती, त्यानंतर पुरस्कार आपण का नाकारला त्याविषयी त्यांनी सांगितले की, मला समाजाने खूप काही दिलं आहे, त्यामुळे आता हा पुरस्कार मी स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी त्यावेळी माडंली होती.

ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे निधन; साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर होऊनही नाकारला होता पुरस्कार
Follow us on

मुंबईः ज्येष्ठ लेखक नंदा खरे (Writer Nanda Khare) यांचे आज दुपारी पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे मुळनाव अनंत यशवंत खरे मात्र त्यांनी नंदा खरे या नावनेच मराठीत लेखन केले. मराठी साहित्यातील समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना स्थान देत त्यांनी कादंबरीलेखन केले होते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या आहेत. 2020 साली त्यांच्या ‘उद्या’ (Udya) या कादंबरीसाठी साहित्य आकादमीचा पुरस्कार (Sahity Akadami Purskar) जाहीर झाला होता, मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला होता.

समाजाने मला खूप काही दिले

साहित्य क्षेत्रातील राष्ट्रीय पातळीवरचा पुरस्कार त्यांनी नाकारल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती, त्यानंतर पुरस्कार आपण का नाकारला त्याविषयी त्यांनी सांगितले की, मला समाजाने खूप काही दिलं आहे, त्यामुळे आता हा पुरस्कार मी स्वीकारणार नाही अशी भूमिका त्यांनी त्यावेळी माडंली होती.

 उजणी धरणाच्या बांधकामात महत्वाचा सहभाग

लेखक नंदा खरे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, त्यांच्या पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाच वयाच्या 76 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. नंदा खरे यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नागपूरात झाले होते, त्यांनंतर त्यांनी मुंबईतील आयआयटी या संस्थेत सिव्हिल इंजीनियरिंगचे शिक्षण घेऊन त्यांनी काही काळ एका खासगी कंपनीत काम केले होते, भीमा नदीवर बांधलेले उजणी धरणाच्या बांधकामात त्यांचा महत्वाचा सहभाग होता.

पुरस्कार आणि गौरव

नंदा खरे यांना विदर्भ साहित्य संघाचा गो. रा. दोडक स्मृती वाड्मय पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा भाई माधवराव बागल पुरस्कार, ‘शब्द: द बुक गॅलरी’ ह्या संस्थेचा भाऊ पाध्ये पुरस्कार, उद्या या कांदबरीला 2020 साली त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी साहित्य आकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता, मात्र त्यांनी हा पुरस्कार नाकारला, त्यांच्या त्याच कादंबरीला लोकमंगल साहित्य पुरस्कारही मिळाला होता. 2017 साली त्यांनी यापुढे कोणतेही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता. त्या भूमिकेमुळेच आपण साहित्य अकादमीचा पुरस्कार नाकारल्याचे त्यांनी सांगितले होते.

नंदा खरे यांचे साहित्य

अंताजीची बखर, इंडिका, उद्या, ऐवजी, कहाणी मानवप्राण्याची, कापूसकोड्यांची गोष्ट, डार्विन आणि जीवसृष्टीचे रहस्य, दगडावर दगड, नांगरल्याविण भुई, बखर अंतकाळाची, वाचताना, पाहताना जगताना, वारूळपुराण, वीसशे पन्नास, संप्रति, ज्ञाताच्या कुंपणावरून, दगड धोंडे, गावगाडाःशतकानंतर, ऑन द बीच ही त्यांची साहित्यनिर्मिती होती.