Eknath Khadse : खडसे समर्थकाला महिलांकडून मारहाण, मराहाणीविरोधात रोहिणी खडसे आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची

याच वेळी पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला आणि हे प्रकरण आणखी वाढत गेलं आहे. या प्रकरणात दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Eknath Khadse : खडसे समर्थकाला महिलांकडून मारहाण, मराहाणीविरोधात रोहिणी खडसे आक्रमक, पोलिसांशी बाचाबाची
खडसे समर्थकाला महिलांकडून मारहाण, मराहाणीविरोधात रोहिणी खडसे आक्रमक, पोलिसांशी बाचाबाचीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 6:35 PM

जळगाव : जळगावचं राजकारण हे राज्याच्या राजकारणात एक अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. त्यामुळे जळगाव मधल्या राजकीय घडामोडी या महाराष्ट्रामध्ये गाजत असतात. मात्र सध्या जळगाव (Jalgaon Politicas) चर्चेत आहे ते रस्त्यावर झालेली तुफान मारहाण आणि त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे एकनाथ खडसे (Eknath Khadse) समर्थकाला रस्त्यावरती महिलांकडून मारहाण करण्यात आली. त्यानंतर यावेळी या विरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadase) आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये जात ठिय्या आंदोलन सुरू केलं. मात्र याच वेळी पोलिसांसोबत त्यांचा वाद झाला आणि हे प्रकरण आणखी वाढत गेलं आहे. या प्रकरणात दोन्ही बाजुने गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मारहाणीचा व्हिडिओ

सुरुवातील नेमका प्रकार काय घडला?

आज या वादाची सुरुवात झाली ती खडसे समर्थकाला मुक्ताईनगर मध्येभर चौकात दोन महिलांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरती बघणाऱ्यांची ही बरीच गर्दी जमली होती. यात शिवेगाळ आणि मारहाण हे सुरू होतं. सोशल मीडियावर बदनामीकारक पोस्ट वायरल केल्यामुळे हा प्रकार घडल्याचे आरोप होत आहेत. तसेच तशाच चर्चाही जळगावात सुरू आहेत. आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि तुम्ही असे प्रकार करता का? असा सवाल करत या महिलांनी या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे. हा राष्ट्रवादीचा खडसेंचा कार्यकर्ता आहे, यात या कार्यकर्त्यावर महिलांनी गंभीर आरोप केले आहेत.

या प्रकारानंतर रोहिणी खडसे आक्रमक

मात्र या मारहाणी विरोधात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे या चांगल्याच आक्रमक झाल्या. त्यानंतर रोहिणी खडसे यांनी आक्रमक होत काही कार्यकर्त्यांसह थेट पोलीस स्टेशन गाठलं. पोलीस अधिकाऱ्यांच्या दालनात पोहोचलेल्या रोहिणी खडसे आणि पोलिसांमध्ये वाद झाला. खडसेंच्या समर्थकाला मुक्ताईनगर मध्येभर चौकात महिलांनी मारहाण केल्याच्या निषेधार्थ पोलीस स्टेशन समोर रोहिणी खडसेंच्या नेतृत्वात कुटुंबीयांचा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं ठिय्या आंदोलन सुरू होतं. मात्र न्याय मिळत नसल्यामुळे पोलीस स्टेशनच्या दालनात ठिय्या मांडण्याचा प्रकार केला, असे रोहिणी खडसे यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र यावेळी पोलिसांनी त्यांना हाकलून लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ही त्यांच्याकडून करण्यात आला आहे आणि या सर्व प्रकारादरम्यानच हा वाद घडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा वाद नेमका कुठे जणार हे अद्याप तरी अनिश्चित आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.