Pune Vidyanand Bapat : ‘मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, तुला कोणी..’ विद्यानंद बापटांवर हल्ला करताना तो तरुण काय बोलत होता?

Pune Vidyanand Bapat : पुण्यात गणेशोत्सवात चालणाऱ्या DJ च्या दणदणाटावर दोन गट पडले आहेत. एक डीजे समर्थक आणि दुसरा डीजे विरोधक. यात डीजेविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर असलेल्या विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला झाला.

Pune Vidyanand Bapat : मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या, तुला कोणी.. विद्यानंद बापटांवर हल्ला करताना तो तरुण काय बोलत होता?
vidyanand Bapat
| Updated on: Sep 03, 2026 | 1:03 PM

पुण्यात गणेशोत्सवात चालणाऱ्या DJ च्या दणदणाटावर दोन गट पडले आहेत. एक डीजे समर्थक आणि दुसरा डीजे विरोधक. यात डीजेविरोधात आवाज उठवण्यात आघाडीवर असलेल्या विद्यानंद बापट यांच्यावर आज हल्ला झाला. टीव्ही 9 मराठीच्या शो मध्ये बोलत असताना विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला झाला. अचानक धावत आलेल्या काही जणांनी विद्यानंद बापट यांच्यावर हल्ला केला. “तुला कोणी ऑब्जेकशन घ्यायला सांगितलय. मला आधी त्याच्या दोन वाजवू द्या. पुणेकरांबद्दल तुला कोणी..” असं हा हल्लेखोर बोलतानाचे शब्द स्पष्टपणे ऐकू येत आहेत.

हल्ला झाल्यानंतर पुणे पोलीस स्टेशनमध्ये विद्यानंद बापट टीव्ही 9 मराठीशी बोलले. “तुम्ही साक्षीदार आहात. तुम्हाला माहित आहे. तुम्ही विचारत असताना एक वेडा आला त्याने हल्ला केला. मी सशस्त्र नव्हतो. पोलीसही तिथे नाहीत हे बघून त्याने हल्ला केला” असं विद्यानंद बापट म्हणाले. आताही टेक्निकली पोलिसांकडे बंदूक नाहीय. त्याला सवंग प्रसिद्धी हवी होती असं बापट म्हणाले. तरुणांचं म्हणणं आहे की, अशा पद्धतीने भूमिका मांडून तुम्ही गणेशोत्सवाला विरोध करताय. त्यावर विद्यानंद बापट म्हणाले की, फुटेज तुमच्याकडे आहे. फुटेज बघून पोलिसांना तुडवून काढूं दे. मुद्याचं उत्तर मुद्याने द्यायचं असतं. गुद्याने द्यायचं नसतं. ते पोलिसांचं काम आहे, ते त्यांचं काम करतील.

तुम्ही सेलिब्रिटी बनलात यावर बापट काय म्हणाले?

विद्यानंद बापट यांचं संस्कृत भाषेवरील प्रभुत्व लक्षात घेऊन त्यांना मराठीतलं शशी थरुर म्हटलं जातय. त्यावर बापट म्हणाले की, “हा प्रत्येकाच्या जजमेंटचा, पर्सनल चॉइसचा प्रश्न आहे. तुम्ही मला काय म्हणता किंवा म्हणत नाही, व्यक्ती महात्म्य वाढवणं हा उद्देश नाही” तुम्ही आता राज्यव्यापी बनलात, सेलिब्रिटी बनलात राज्यभरात तुमचं नाव चर्चेत आहे, यावर विद्यानंद बापट म्हणाले की, “सवंग प्रसिद्धी मिळवणं हा माझा उद्देश नव्हता. पण चांगल्या कार्यासाठी प्रसिद्धी मिळत असेल तर मी त्यापासून परान्मुखही नाही” पुण्यात टिळक रोडवर बापट यांच्यावर हा हल्ला झाला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us