Vidyanand Bapat: DJ ची बोलती बंद करणारे विद्यानंद बापट कुठं करतात काम? मोठी माहिती समोर
Vidyanand Bapat Opposes DJ: डीजेची बोलती बंद करणारे विद्यानंद बापट सध्या इंटरनेटवर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. या पुणेकराला महाराष्ट्रानेच नाही तर देशानं डोक्यावर घेतलं आहे. सुसंस्कृतपणे आपले बेधडक मत मांडणाऱ्या बापटांची तरुणाईमध्ये क्रेझ आहे. पण बापट कुठं काम करताते हे तुम्हाला माहिती आहे का?

गणेशोत्सवात, सण-उत्सवात डीजेच्या अलिखित धिंगाण्याला एका पुणेकराने वेसण घालण्याचा विडा उचलला आहे. डीजेटी बोलती बंद करणारे विद्यानंद बापट यांनी इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. त्यांचा साधेपणा, सुसंस्कृतपणा, मुद्देसुद मांडणी आणि तर्काला धरून विरोध करण्याच्या पद्धतीने अबालवृद्धांना आकर्षित केले आहे. विद्यानंद बापटांविषयी जो तो गुगल करत आहे. त्यांच्याविषयी मिळेल ती माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत. बापट हे कुठे काम करतात हे तुम्हाला माहिती आहे का?
BPO कंपनीत करतात बापट काम
विद्यानंद बापट हे एका बीपीओ कंपनीत काम करतात. या कंपनीत ग्राहकांच्या अडचणी, प्रश्न आणि तक्रारींवर मार्ग काढला जातो. ग्राहकांना फोनवरून माहिती दिली जाते. समस्येवर उपाय सांगितल्या जातो. या कंपनीत इनबाऊंड आणि आऊटबाउंड कॉलिंगद्वारे संवाद साधत ग्राहकांच्या शंकेचे, तक्रारीचे निरासन करण्यात येते. ग्राहकांच्या प्रश्नांनाना चॅटच्या माध्यमातूनही उत्तर देण्यात येते. ईमेलद्वारे ही ग्राहकांच्या अडचणीवर उपाय सांगितला जातो. ग्राहकांची माहिती ही कंपनी संगणकीय प्रणालीवर नोंदवते. या ठिकाणी ग्राहकांची कागदपत्रे, माहिती आणि खात्यांची तपासणी करण्यात येते. या कंपनीकडून इंटरनेट, सॉफ्टवेअर अथवा इतर तांत्रिक उपकरणांशी संबंधित अडचणी सोडवल्या जातात. ही कंपनी फोनद्वारे उत्पादनं आणि सेवांची विक्री करते. नवीन ग्राहक हुडकण्यात येतात. या नवीन ग्राहकांचा डेटा कंपन्यांना देण्यात येतो. मराठी, हिंदी आणि इतर भारतीय भाषांमध्ये ग्राहकांना सेवा देण्यात येते. ही बीपीओ कंपनी आंतरराष्ट्रीय सेवा ही देते.
डीजेविरोधात दमदार भूमिका
पुण्याच्या गणेशोत्सवात डीजेला मोठ्या प्रमाणात विरोध झाला आहे. या असंतोषाचे नेतृत्व पुण्यातील नारायण पेठेतील रहिवासी विद्यानंद बापट यांनी केले आहे. पुणे महापालिकेच्या पूर्वतयारी बैठकीत डीजे बंदीचा मुद्दा अत्यंत आक्रमपणे त्यांनी मांडला. त्यांच्या या भूमिकेने काहींचा तिळपापड झाला. त्यांनी लागलीच बापटांना या बैठकीतून बाहेर काढले. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी तार्किक मुद्दे मांडले. हे मुद्दे जनसामन्यांनी उचलून धरले.त्यांच्या जागरुकतेबद्दल त्यांनी बापटांची पाठ थोपटली. त्यांचे कौतुक केले. बापट सर्वसामान्यांचे हिरो ठरले.
सण उत्सव साजरे करणे हा जन्मसिद्ध हक्क नाही. तो एक विशेष अधिकार आहे. इंग्रजीत त्याला प्रिव्हिलेज म्हटले जाते. विशेष अधिकाराने साजरे केले जाणारे सण उत्सव साजरे केले नाहीत म्हणून फार काही फरक पडत नाही, अशी थेट भूमिका विद्यानंद बापट यांनी घेतली आहे.