राजनाथ सिंह यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस, रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवर केली चर्चा

| Updated on: Nov 21, 2021 | 7:39 PM

राजनाथ सिंह मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर सिंह यांनी रश्मी ठाकरे यांना फोन केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आस्थेवाईकपणे विचारपूल केली. तसेच ठाकरेंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनासुद्धा त्यांनी केली.

राजनाथ सिंह यांच्याकडून उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस, रश्मी ठाकरे यांच्याशी फोनवर केली चर्चा
UDDHAV THACKERAY AND RAJNATH SINGH
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मान आणि मनक्याच्या आजाराशी संबंधित शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याशी सिंह यांनी फोनवरुन संवाद साधत ही चौकशी केली आहे.

राजनाथ सिंह यांनी केली आस्थेवाईकपणे विचारपूस

राजनाथ सिंह मुंबईमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमानंतर सिंह यांनी रश्मी ठाकरे यांना फोन केला. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आस्थेवाईकपणे विचारपूल केली. तसेच ठाकरेंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थनासुद्धा त्यांनी केली.

ठाकरे यांना मणका, मानदुखीचा त्रास

मागील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांना मान आणि मनक्याचा त्रास होत होता. एका कार्यक्रमात ते मानेला पट्टा बांधून आल्याचे दिसले होते. हा त्रास वाढल्यामुळे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थित राहणे टाळले होते. तसेच दिवळीनिमित्त भेटीसाठी आलेल्या मान्यवरांनादेखील ते भेटले नव्हते. त्यानंतर ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबर रोजी सर्व्हायकल स्पाईन संबंधित यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गिरगावातील एच. एन. रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेसाठी एक आवाहन प्रसिद्ध केलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती दिली होती. गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळं लवकरच तब्येत बरी होईल अशी खात्री आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, सध्या ठाकरे यांची प्रकृती उत्तम असून राज्याच्या कारभारावर ते लक्ष ठेवून आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी दिलीय.

इतर बातम्या :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस अमरावतीच्या दौऱ्यावर, हिंसाचारात जखमी झालेल्यांची भेट घेणार

शिवसेनेला पुन्हा धक्का, रत्नागिरीत राष्ट्रवादीत इनकमिंग सुरुच, शिवसेनेच्या नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांचा पक्ष प्रवेश

नको तिथं डोकं! खिडकीतून घुसण्यासाठी चोराने तीन महिन्यात 10 किलो वजन घटवलं, 37 लाखांवर डल्ला